संसदेची तब्येत सुधारणार : महाराष्ट्रातून सात डाॅक्टर संसदेत जाणार!

संसदेची तब्येत सुधारणार : महाराष्ट्रातून सात डाॅक्टर संसदेत जाणार!

पुणे : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत सात डाॅक्टर रिंगणात होते. त्यापैकी सहाही जण आघाडीवर आहेत. हे सातहीजण एबीबीएस आहेत. त्यानंतर काहींची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 

यात संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांचा धुळ्यातून विजय निश्चित आहे. ते एक लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भामरे हे कर्करोगतज्ञ आहेत. ठाण्याचे आमदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे दुसऱ्यांदा खासदार होत आहेत. ते अस्थिरोगतज्ञ आहेत. बीडमधून डाॅ. प्रीतम मुंडे, डाॅ. हिना गावित या दुसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने चार डाॅक्टर निवडून दिले होते. ते पाचही जण पुन्हा संसदेत जाण्याच्या तयारीत आहेत.

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे 50 हजारांनी आघाडीवर आङेत. नगरमधून विखे पाटील हे लाखाहून अधिक मतांनी पुढे आहेत. विखे हे न्यूरोलाॅजिस्ट आहेत. भाजपच्या डाॅ. भारती पवार या दिंडोरीतून पहिल्यांदा खासदार होत आहे. यात भाजपचे पाच, शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक खासदार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com