Sinner BJP Leaders Morcha | Sarkarnama

दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी सिन्नरला भाजप नेते कोकाटेंचा मोर्चा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे. यावर आता राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नेते सावध झाले आहेत. या प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिन्नरला भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मोर्चा काढला. 

नाशिक : पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे. यावर आता राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नेते सावध झाले आहेत. या प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिन्नरला भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मोर्चा काढला. 

हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आल्यावर निवेदन देण्यात आले. यावेळी "हा मोर्चा आमदारांच्या विरोधात नाही. राज्य शासनाच्या विरोधात तर मुळीच नाही. तर दुष्काळामुळे तालुक्‍याला भविष्यात भयावह अशा संकटाला सामोरे जावे लागणार आहे. दृरदृष्टी म्हणून शासनाचे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना करुन दुष्काळाची दाहकता कमी व्हावी हा प्रयास आहे. सामान्यांच्या मुलभूत हक्कासाठी हा मोर्चा काढला आहे," असे माजी आमदार कोकाटे यांनी सांगीतले. 

तालुक्‍यातील दुष्काळाच्या प्रश्‍नावर कोकाटे यांच्या बसस्थानकावरील कार्यालयापासून मोर्चाची सुरवात झाली. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सभेद्वारे त्याचा समारोप झाला. यावेळी आमदारांच्या विरोधात मोर्चा नसल्याचे सांगता सांगता त्यांनी शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्यावर टीका केलीच. "आमदार कारकुनाला निवेदन देतात. निवेदन त्या विभागाचे प्रमुख किंवा मंत्र्यांना द्यायचे असते. ते आमदारांना कळत नाही. तालुक्‍यात दुष्काळावर अद्याप समन्वय समितीची एखही बैठक झालेली नाही," अशी टीका त्यांनी केली. 

मोर्चात बंडूनाना भाबड, विजय गडाख, सुनिल केकाण, आर. टी. शिंदे, डी. पी. आव्हाड आदींची भाषणे झाली. जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, राजेंद्र चव्हाणके, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते नामदेव लोंढे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, भाजप नेते गंगाधर वरंदळ आदींसह विविध नेते सहभागी झाले होते. 

संबंधित लेख