Sinnar MLA Rajabhau Waje | Sarkarnama

रोज गाईची धार काढणारे आमदार राजाभाऊ वाजे 

संपत देवगिरे 
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

सिन्नरचे शिवसेना आमदार पगार उर्फ राजाभाऊ वाजे शेतकरी अन्‌ व्यवसायिक पार्श्‍वभूमी असलेले आमदार आहेत. त्यांचा दिनक्रम सुरु होतो पहाटे गाईची धार काढण्यापासून. शेती व पाळीव प्राण्यांशी बालपणापासूनच त्यांना लळा आहे. आमदार झाल्यावरही त्यांनी ही सवय कायम ठेवली. त्यामुळे रोज शेकडो नागीरकांच्या गाठीभेटी, शासकीय कार्यालयांचा पाठपुरावा, कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क सुरु असतानाही ते आपल्या गोठ्यापासून आपला दिवस सुरु करतात.

नाशिक : सिन्नरचे शिवसेना आमदार पगार उर्फ राजाभाऊ वाजे शेतकरी अन्‌ व्यवसायिक पार्श्‍वभूमी असलेले आमदार आहेत. त्यांचा दिनक्रम सुरु होतो पहाटे गाईची धार काढण्यापासून. शेती व पाळीव प्राण्यांशी बालपणापासूनच त्यांना लळा आहे. आमदार झाल्यावरही त्यांनी ही सवय कायम ठेवली. त्यामुळे रोज शेकडो नागीरकांच्या गाठीभेटी, शासकीय कार्यालयांचा पाठपुरावा, कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क सुरु असतानाही ते आपल्या गोठ्यापासून आपला दिवस सुरु करतात.

सकाळी ते स्वतः त्यांच्या सर्व गाई-बैलांना चारा टाकतात. गाईची धार काढतात. त्यानंतर त्यांची दिनचर्या सुरु होते. तोपर्यंत ग्रामस्थ, कार्यकर्ते भेटायला आलेले असतात. त्यांच्याशी त्यांचा संवाद सुरु होतो. बालवयात कुटुंबांची जबाबदारी आल्याने दहावीत शिकत असतांनाच त्यांनी शेतीचे काम सुरु केले. तेव्हापासून ते रोज सकाळी उठल्यावर आधी गाईची धार काढतात. सध्या आमदार झाल्याने परगावी अथवा विधीमंडळाच्या कामकाजामुळे त्यात खंड पडतो. मात्र, त्यामुळे गाई, बैल, प्राण्यांचा लळा जराही कमी झालेला नाही असे आमदार वाजे यांनी सांगितले. 

आमदार राजाभाऊ वाजे कुटुंबाला दीर्घ राजकीय परंपरा आहे. त्यांचे आजोबा शंकर बाळाजी वाजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्या निवडणुकीत आमदार झाले. तर त्यानंतर 1967 मध्ये त्यांच्या आजी रुक्‍मिणीबाई वाजे या सिन्नर तालुक्‍याच्या पहिल्या महिला आमदार होत्या. सर्व समाजघटकांशी सलोख्याचे संबंध होते. ग्रामीण भागाशी एकरुप असलेले, सिन्नर शहराच्या विकासात महत्वाची भूमिका असलेले कुटुंब म्हणुन ते परिचीत होते. त्यांचे वडील प्रकाश वाजे सिन्नर नगरपालिकेत अनेक वर्षे सक्रीय होते. 2009 मध्ये प्रकाश वाजे यांनीही विधानसभेची निवडणुक लढविली होती. राजाभाऊ वाजे 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. 

त्यापूर्वी अनेक वर्षे ते सामाजिक कार्यात सक्रीय राहिले आहेत. परिसरात पुणे महामामार्ग अथवा अन्यत्र कुठेही अपघात झाल्यास मदतीसाठी ते धाऊन जातात. त्यामुळे रुगणवाहिकेच्या आधी अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचणारे कार्यतर्ते असा राजाभाऊ वाजे यांचा नावलौकीक आहे. त्यांच्या या सामाजिक कामाच्या पाठबळावरच तालुक्‍यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. 

संबंधित लेख