singhad sharad pawar | Sarkarnama

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन शरद पवार यांच्या कोर्टात 

उमेश घोंगडे 
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पुणे : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पवार यांना भेटण्यासाठी आज बारामतीला गेले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, संस्था तसेच प्राध्यापकांच्या प्रतिनिधींशी आपण बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. 

सिंहगड संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी गेल्या सोळा महिन्याचे वेतन मिळत नसल्याच्या कारणावरून आंदोलन सुरू केल्याने अध्यापनाचे काम पूर्णपणे बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामावर परिणाम झाला असून परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचा संताप आणखी वाढला आहे. त्यामुळे एक आशेचा किरण म्हणून विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. 

सिंहगडच्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार तसेच विद्यापीठाने प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. वास्तविक संस्थेच्यावतीने चालविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम व या अभ्यासक्रमांसाठी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकार किंवा विद्यापीठाने फार काही केले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. परीक्षा जवळ आली आहे. अभ्यास अभ्यासक्रम पूणे शिकवून झालेले नाहीत. त्यामुळे अभ्यास करण्याऐवजी आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आशा आता पवार यांच्याकडे लागल्या आहेत. पवारसाहेब काहीतरी मार्ग नक्की काढतील, अशी भावना विद्यार्थ्यांनी "सरकारनामा'शी व्यक्त केली. 
 
संबंधित लेख