singapur pollution council sidhartha shirol speech | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सार्वजनिक वाहतूक व प्रदूषणावर सिद्धार्थ शिरोळे बोलणार सिंगापूरच्या परिषदेत 

उमेश घोंगडे 
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) संचालक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे आशिया खंडातील वाहतून समस्या व त्यातून होणारे प्रदूषण या विषयावर सिंगापूर येथील परिषदेत बोलणार आहेत. 

येत्या 22 व 23 ऑक्‍टोबरला सिंगापूर येथे होणाऱ्या "ग्लोबल मास ट्रान्झिट' या परिषदेत सादरीकरण करण्यासाठी शिरोळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत "क्‍लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक' या विषयावर विशेष चर्चा होणार आहे. 

पुण्यात इलेक्‍ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 150 बस घेण्यात येणार आहेत. ही खरेदी लवकरच होऊन नजीकच्या काळात पुण्याच्या रस्त्यांवर आधुनिक व पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक बस धावताना दिसतील. देशात प्रथमच इतक्‍या मोठ्याप्रमाणात अशा प्रकारची बस खरेदी करण्यात येत असल्याचे शिरोळे यांनी या निमित्ताने सांगितले. 

सार्वजनिक वाहतूक व प्रदूषण हा पुण्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असून या विषयावरच आशिया खंडातील सार्वजनिक वाहतूक व त्यातून होणारे प्रदूषण या विषयांवर शिरोळे सादरीकरण करणार आहेत. 

संबंधित लेख