सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी रेश्‍मा सावंत 

कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी अध्यक्षपद सावंतवाडी तालुक्‍याला देवून शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांना एकप्रकारे राजकीय शह दिला आहे. सौ. सावंतसावंतवाडीलगतच्या माजगाव येथील असून या गावाला दुसऱ्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले. पूर्वी अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या गावचे सुपुत्रभाईसाहेब सावंत यांनी भूषविले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी रेश्‍मा सावंत 
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी रेश्‍मा सावंत 

सिंधुदुर्गनगरी :  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसच्या रेश्‍मा सावंत तर उपाध्यक्षपदी रणजित देसाई यांची वर्णी लागली. स्वतंत्रपणे निवडणूक
लढलेल्या शिवसेना- भाजपने एकत्र येत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत सहभाग घेतला. मात्र कॉंग्रेसने बाजी मारली. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. पीठासीन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र
सावळकर यांनी ही प्रक्रिया घेतली. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या रेश्‍मा सावंत यांना 28 तर शिवसेनेच्या वर्षा पवार
यांना 22 मते मिळाली. त्यामुळे सावंत सहा मतांनी विजयी झाल्या. उपाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या देसाई यांनाही 28 तर भाजपच्या सुधीर नकाशेंना 22 मते मिळाली.
जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे 27, राष्ट्रवादीचा एक, शिवसेना 16 तर भाजपचे 6 सदस्य आहेत. ही निवडणूक आघाडीविरुद्ध युती अशी झाली. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. अनेक वर्षे सावंतवाडीला अध्यक्षपद मिळाले नव्हते. यावेळी शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही
सावंतवाडीने कॉंग्रेसला भरीव यश दिले. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ तिसऱ्यांदा सदस्य झालेल्या रेश्‍मा सावंत यांच्या गळ्यात पडेल अशी शक्‍यता होती. अपेक्षेप्रमाणे
कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी सावंत यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी दिली. उपाध्यक्षपदी कुडाळमधील नेरुर मतदार संघातून विजयी रणजित देसाई
यांना दुसऱ्यांदा या पदावर संधी देण्यात आली आहे. त्यांनी या आधीची उपाध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वीरीत्या पार पाडली होती. कृषी महोत्सवाचे आयोजन त्यांच्या
कारकिर्दीमधील माईल्ड स्टोन ठरला होता. 

अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसतर्फे सौ. सावंत आणि उपाध्यक्षपदासाठी श्री. देसाई यांनी अर्ज भरला. यावेळी आमदार नितेश राणे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, मावळते
अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, अशोक सावंत, सतीश सावंत, गोट्या सावंत आदी उपस्थित होते. शिवसेनेतर्फे अध्यक्षपदासाठी वर्षा पवार
आणि उपाध्यक्ष पदासाठी श्री. नकाशे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, संजय पडते, सदाशिव ओगले आदी युतीचे पदाधिकारी उपस्थित
होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com