Sindhudurg news - Nitesh Rane and Vikrant Sawant criticises each other | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

नितेश राणेंनी आपला पक्ष जाहीर करावा - विक्रांत सावंत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

नितेश राणे यांनी माझ्यासह माझ्या घराण्यावर टीका करण्यापेक्षा आपण कोणत्या पक्षात आहे, हे जाहीर करावे. ते स्वाभीमान पक्षात असतील तर त्यांनी तसे जाहीर करून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपल्या स्वार्थासाठी सोईची भूमिका घेवू नये, अशी टीका शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांनी आज येथे केली. 

सावंतवाडी : नितेश राणे यांनी माझ्यासह माझ्या घराण्यावर टीका करण्यापेक्षा आपण कोणत्या पक्षात आहे, हे जाहीर करावे. ते स्वाभीमान पक्षात असतील तर त्यांनी तसे जाहीर करून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपल्या स्वार्थासाठी सोईची भूमिका घेवू नये, अशी टीका शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांनी आज येथे केली. 

ज्या वेळी राणेंच्या घरातील कोणीच राजकारणात नव्हते तेव्हा (कै.) भाईसाहेब यांच्यापासून आमचे घराणे समाजकारणात आहे. त्यामुळे नितेश यांनी आम्हाला राजकारणाच्या गोष्टी सांगू नयेत असेही श्री. सावंत म्हणाले.

श्री. सावंत यांनी राणेंचा नवा पक्ष कणकवली मर्यादीत अशी टिका केली होती. त्याला आमदार राणे यांनी उत्तर दिले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री. सावंत यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, सागर नाणोसकर, प्रशांत कोठावळे, तेजस परब, सुदेश राणे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. सावंत यांनी नितेश राणे यांच्यावर टिका केली. ते म्हणाले,“नितेश यांनी माझ्यावर वैयक्तीक स्वार्थापोटी टिका केली आहे; मात्र टिकेसाठी टिका करण्यापेक्षा ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनी जाहीर करावे. त्यांचे म्हणणे आपण स्वाभीमान पक्षाचे आहोत असे असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कणकवली मतदार संघात शिवसेना आपल्या ताकदीवर निवडणूक लढण्यास समर्थ आहे.”

श्री. सावंत पुढे म्हणाले, ``मी माजी मुख्यमंत्री राणे यांच्यावर कधीही टीका केलेली नाही. त्यांचा मी आदर करतो; मात्र त्यांच्या प्रवृत्तीविरोधात मी बोललो होतो. आम्ही जरी बाप-मुलगा शाळा सांभाळत असलो तरी वर्षाकाठी तीन हजारांहून अधिक मुलांना चांगले ज्ञान देतो. त्यांना घडवितो. त्यामुळे इतके पालक विश्‍वासाने आपल्या मुलांना आमच्या संस्थेत पाठवितात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमची काळजी राणेंनी करू नये. आमच्या घराण्याला राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे. राणेंच्या घरातसुध्दा कोणी राजकारणात नव्हते तेव्हापासुन (कै.) भाईसाहेब सावंत राजकारणात आणि समाजकारणात होते. त्यांचे बाळकडू आम्ही घेतले आहे. त्यांच्याबद्दल आजही जिल्ह्यातील नव्हे राज्यातील लोकांना आदर आहे. त्यामुळे गर्वाने त्यांचे नाव घेतले तर वावगे काय?''

त्यांनी यावेळी राणे समर्थक संजू परब यांच्यावर टीका केली. ते म्हणाले,``मी दिसायला बरा असलो तरी आज माझ्यामागे राजकीय घराण्याचा वारसा आहे. विधानसभा प्रमुख पद मला शिवसेनेकडून देण्यात आले आहे. याचा अर्थ मी सक्षम आहे असा होतो. त्यामुळे मला विटी दांडू बक्षीस देईन असे विधान करणार्‍या परब यांनी समस्त युवक वर्गाचा अपमान केला आहे. याची दखल घेवून येणार्‍या निवडणुकात अठरा ते तीस वर्षातील तरुणांनी त्यांना मतदान करू नये. त्यानंतर त्यांची पात्रता त्यांना दिसेल."

निलेश राणेंना विटी दांडू दिला होता का? 

श्री. सावंत म्हणाले, ``माझे वय राजकारणात विटी दांडू खेळायचे आहे; मात्र माजी खासदार निलेश राणे हे वयाच्या 26 व्या वर्षी खासदार झाले होते. त्यांना विटी दांडू बक्षीस दिला होता की काय याचे उत्तर द्यावे. मी कोणत्याही शिक्षकाला राजकीय स्वार्थापोटी कामावरुन काढलेले नाही आणि तसे आरोप करण्यापेक्षा परब यांनी ते सिद्ध करून दाखवावेत.''

संबंधित लेख