Sillod MLA Sattar arranges a rally to help Kerala flood affected people | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

केरळ पूरग्रस्तांसाठी आमदार सत्तार यांची मदत फेरी

सरकारनामा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

 देशबांधवांना सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करत सत्तार यांनी आज (ता.23) सिल्लोड शहरातून मदत फेरी काढून आवाहन केले.

सिल्लोड : केरळ राज्यावर निसर्ग कोपलासर्वत्र निसर्ग कोपला असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. संपूर्ण देशातून केरळमध्ये मदत येत आहे. महाराष्ट्र सरकार कडून अन्न, धान्य आणि औषधी पाठवण्यात आलेली असताना काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

 देशबांधवांना सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करत सत्तार यांनी आज (ता.23) सिल्लोड शहरातून मदत फेरी काढून आवाहन केले.

सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड शहरातील व्यापारी - प्रतिष्ठित यांची भेट घेऊन  आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्याला शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला.

संबंधित लेख