Silent Support to Kardile's Daughters by BJP | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आमदार कर्डिलेंच्या राष्ट्रवादीमधील लेकींना भाजपकडून हिरवा कंदील?

मुरलीधर कराळे
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

महापालिकेवर कायम आमदार कर्डिले यांचे लक्ष आहे. सोयरे-धायरेच्या राजकारणात एकमेका साह्य करूची भूमिका घेवून त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यापूर्वी महापाैर होण्यासाठी संदीप कोतकर तर आमदार होण्यासाठी संग्राम जगताप यांना त्यांची मदत लाखमोलाची ठरली. आताही केडगावमध्ये राजकीय उलथापालथ कर्डिले यांनीच केल्याचे बोलले जाते.

नगर : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दोन मुली महापालिकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका शीतल जगताप, व ज्योती अमोल गाडे यांनी एेनवेळी अर्ज भरून त्या प्रभागांत धक्कातंत्र वापरले. आता त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांची पळती भूई थोडी झाली नसेल, तर नवलच. कारण आमदार कर्डिले भाजपमध्ये असले, तरी आपल्या राष्ट्रवादीकडून लढत असलेल्या मुलींच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावतील, यात शंका नाही. दरम्यान, सर्वच प्रभागांत उमेदवार देणाऱ्या भाजपाने एका मुलीच्या विरोधात उमेदवारच दिला नाही.

महापालिकेवर कायम आमदार कर्डिले यांचे लक्ष आहे. सोयरे-धायरेच्या राजकारणात एकमेका साह्य करूची भूमिका घेवून त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यापूर्वी महापाैर होण्यासाठी संदीप कोतकर तर आमदार होण्यासाठी संग्राम जगताप यांना त्यांची मदत लाखमोलाची ठरली. आताही केडगावमध्ये राजकीय उलथापालथ कर्डिले यांनीच केल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे उमेदवार भाजपला मिळवून देऊन झालेला राजकीय भूकंप नगरकरांनी अनुभवला. प्रारंभी कर्डिले यांच्या मुली निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे कार्यकर्त्यांना सांगण्यात येत होते. नंतर मात्र अचानक त्यांची एन्ट्री झाल्याने राजकीय मंडळींच्या भुवया उंचावल्या.

राष्ट्रवादीला दिली भाजपने साथ
ज्योती गाडे यांनी प्रभाग चारमधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली आहे. या प्रभागात भाजपने खेळी करीत उमेदवारच दिला नाही. त्यामुळे कर्डिले यांच्या मुलीसाठी अप्रत्यक्ष राष्ट्रवादीलाच मदत केली, असा त्याचा अर्थ निघतो. या प्रभागात शिवसेनेने मात्र उमेदवार देवून जोरदार प्रचाराचे नियोजन केले आहे.

संबंधित लेख