वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात गेलेल्या सिद्धूला पहिल्या रांगेत मानाचे पान! 

सिद्धू वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात गेले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान मिडीयाशी संवाद साधला. इम्रान खान यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात गेलेल्या सिद्धूला पहिल्या रांगेत मानाचे पान! 

पुणे: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांत माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने यश मिळवल्यानंतर शपथविधीला भारतातून कोण कोण जाणार, याची चर्चा सुरु झाली होती. माजी क्रिकेटपटू आणि पंजाब राज्यातील कॅबीनेटमंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी शपथविधीला जाणार असल्याचे जाहीर केले होते, त्याप्रमाणे ते गेले. 

इम्रान हा कडवा भारतविरोधक असल्याची भूमिका घेवून शपथविधीला जावू नये, असे आवाहन काही संघटनांनी केले होते. त्यामुळे कपिल देव, आमिर खान यांच्यासह अनेक सेलेब्रेटींना पाकिस्तानला जाणार नसल्याचे म्हटले, मात्र सिद्धू यांनी निमंत्रण स्वीकारल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे सिद्धू वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात गेले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान मिडीयाशी संवाद साधला. इम्रान खान यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. 

इस्लामाबादमध्ये सकाळी शपथविधीचा सोहळा पार पडला. यावेळी सिद्धू यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान देण्यात आला होता. पाकिस्तान आर्मी चिफ यांच्याबरोबर वरिष्ठ अधिकारी सिद्धूंना भेटत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com