sidharamayye meeting with congress leaders | Sarkarnama

सिद्धरामय्यांच्या मध्यस्थीमुळे कॉंग्रेसमधील बंड होणार थंड 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 डिसेंबर 2018

दोन दिवसांत सर्व काही सुरळीत होईल

बंगळूर : मंत्रिमंडळ विस्तारावरून कॉंग्रेस आमदारांत निर्माण झालेला असंतोष काहीसा शांत होण्याच्या मार्गावर आहे. नाराज ज्येष्ठ आमदार रामलिंगा रेड्डी, भीमा नायक, सुधाकर यांच्यासह काही आमदारांशी समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली आहे. 

त्यामुळे दोन दिवसांत सर्व काही सुरळीत होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केला. सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मंगळवारी (ता. 25) सकाळी चर्चा केली. या वेळी रेड्डी यांनी आपली नाराजी स्पष्ट केली. सिद्धरामय्या यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. युती सरकारमध्ये सर्वांना योग्य स्थान देणे शक्‍य झाले नाही, परंतु पुढील काही दिवसांत सर्व सुरळीत होईल, असा त्यांनी विश्‍वास दिला. 

संबंधित लेख