जगताप लोकसभेला मावळमध्ये उमेदवार असतील, तर फायद्याचे : श्रीरंग बारणे यांची डरकाळी

"मरेपर्यंत पक्ष सोडणार नाही, अशी प्रतिज्ञा गेल्या लोकसभा निवडणुकीला (2014) घेणारे शेकापचे (शेतकरी कामगार पक्ष) उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी नंतर चार महिन्यातच शेकाप सोडला. भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रतिज्ञेची क्लिप माझ्याकडे आहे. त्यामुळे यावेळच्या लोकसभेला ते, जर माझे प्रतिस्पर्धी असतील, तर ते मला फायदेशीरच ठरेल," असे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.
जगताप लोकसभेला मावळमध्ये उमेदवार असतील, तर फायद्याचे : श्रीरंग बारणे यांची डरकाळी

पिंपरी :  "मरेपर्यंत पक्ष सोडणार नाही, अशी प्रतिज्ञा गेल्या लोकसभा निवडणुकीला (2014) घेणारे शेकापचे (शेतकरी कामगार पक्ष) उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी नंतर चार महिन्यातच शेकाप सोडला. भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रतिज्ञेची क्लिप माझ्याकडे आहे. त्यामुळे यावेळच्या लोकसभेला ते, जर माझे प्रतिस्पर्धी असतील, तर ते मला फायदेशीरच ठरेल," असे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

जगताप हे सध्या पिंपरी-चिंचवडचे भाजप अध्यक्ष आहेत. तसेच ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातून 2014 ला भाजपकडून निवडून आलेले आहेत. त्यांनी आपले कट्टर राजकीय शत्रू असलेल्या बारणे यांच्याविरुद्ध 2019 ची लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. पिंपरी-चिंचवड या राज्याच्या उद्योगनगरीचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळणार या शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणामुळे श्रीरंगअप्पांचा उत्साह दुणावल्याचे  दिसून आले. त्यामुळे एरव्ही आव्हानाची भाषा न करणारे व काहीशा शांत अप्पांनी आता, सौम्य का होईना पक्षाला साजेशी अशी डरकाळी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध फोडली आहे.

युती झाली नाही, तर भाजपच त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष व जगताप हे मु्ख्य विरोधी उमेदवार असणार आहेत. माझ्याविरुद्ध समोर कोण उमेदवार आहे,त्याची मी फिकीर करीत नाही. कारण निधड्या छातीने मी राजकारण करतो, असे ते म्हणाले. त्याचवेळी मला कुणाला आव्हानही द्यायचे नाही, अशी मुत्सद्देगिरीची भाषाही त्यांनी वापरली.   

बारणे म्हणाले, "शरद पवार यांनी जगताप यांना मोठे केले. नगरसेवक ते आमदार केले. पण त्यांनी सत्तेसाठी राष्ट्रवादी पक्ष सोडला. तोच नव्हे, तर नंतर घरोबा केलेला शेकाप हा दुसरा पक्षही चार महिन्यात सोडला. त्यानंतर 2014 ला ते भाजपमध्ये जाऊन आमदार झाले. 2009 ला त्यांच्याविरुद्ध विधानसभेला बनावट मतांमुळे माझा पराभव झाला होता. त्याचे उट्टे नंतर मी लोकसभेला चार महिन्यात  काढले, हा भाग वेगळा. 2019 ला,तर मी गेल्या चार वर्षात केलेल्या कामांमुळे लोकांचाच पक्षविरहित असा उमेदवार असणार आहे. त्यामुळे समोर कोण आहे, त्याची मी पर्वा करीत नाही. दररोज दहा बारा तास मी काम करीत असून शेकडो लोकांना भेटत आहे. उद्या निवडणूक आहे,असे गृहित धरून मी काम केलेले आहे.त्यामुळे पुन्हा मावळचा खासदार मीच होणार हे सांगायला आता भविष्यकाराचीही गरज उरलेली नाही."
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com