Shripad Chhindam facing externment action | Sarkarnama

नगर महापालिका निवडणूक : श्रीपाद छिंदमवर हद्दपारीची टांगती तलवार ? 

मुरलीधर कराळे 
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल अनेक गुन्हे  दाखल झालेल्या  माजी उपमहापाैर श्रीपाद छिंदम याने महापालिकेत प्रभाग क्रमांक नऊ क मधून दंड पुन्हा दंड थोपटले आहे. मात्र प्रशासनाने  छिंदम याला हद्दपारीची नोटीस बजावली आहे .   हद्दपारीची टांगती तलवार  डोक्यावर असताना श्रीपाद छिंदम कसा प्रचार करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे . 

आता प्रांताधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल असणाऱ्यांना तडीपारीचे आदेश दिले आहेत. त्यात छिंदम याचाही समावेश आहे. उद्या (मंगळवारी) याबाबत निकाल जाहीर होऊन त्याला पुन्हा जिल्हा बंदी होते का, याकडे लक्ष लागले आहे. जिल्हाबंदी असताना जिल्ह्याबाहेर राहून तो निवडणूक कशी लढवेल याबाबत चर्चा आहे . 

छिंदम विरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश तिवारी यांनी अर्ज भरला असल्याने या निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजप व राष्ट्रवादी-काॅंग्रेस आघाडीने अद्याप तेथे उमेदवार जाहीर केली नाही. त्यामुळे छिंदम याच्याविरोधात कोण- कोण लढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

छिंदम उपमहापाैर असताना पालिका कर्मचाऱ्यास काम सांगताना त्याने शिवजयंतीच्या दरम्यान शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चिडून जावून छिंदमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. याबाबद दोन्ही बाजुंनी गुन्हे दाखल झाले होते. शिवसेना व शिवप्रेमी संघटनांनी मोर्चे काढून संपूर्ण शहर दणाणून टाकले. याचे पडसाद राज्यभर उमटले. 

दरम्यान, छिंदम याला जिल्हा बंदी करण्यात आली होती.दरम्यानच्या काळात भाजपने छिंदमची हकालपट्टी केली होती. उपमहापाैरपदाचाही राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. मात्र छिंदम आल्यानंतर त्याने आपण राजीनामा दिला नसल्याचे सांगून पुन्हा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले. त्याप्रमाणे छिंदमने उमेदवारी अर्ज भरला आहे.

संबंधित लेख