shrimant wagh resigns from upsarpanch post | Sarkarnama

उपसरपंच असलेल्या रासप पदाधिकाऱ्याचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

वाठार स्टेशन (कोरेगाव, जि. सातारा) : मराठा समाजाच्या आंदोलनानंतरही आरक्षणाबाबत शासनाकडून कोणतीच भुमिका घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ जाधववाडी (ता. कोरेगाव) चे उपसंरपंच व रासपचे युवकचे तालुकाध्यक्ष श्रीमंत वाघ यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाला पाठींबा म्हणून हा सातारा जिल्ह्यातील पहिला राजीनामा आहे. 

श्रीमंत भाऊसाहेब वाघ हे राष्ट्रीय समाज पक्षाचे कोरेगाव तालुका युवकचे अध्यक्ष आहेत. तसेच ते जाधववाडीचे उपसरपंचही आहेत. त्यांनी आज मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा आपल्या पदाचा राजीनामा सरपंच रामचंद्र जाधव यांच्याकडे सुपुर्त केला.

श्री. वाघ म्हणाले, गेली दोन वर्षापासून आरक्षणासाठी मराठा समाज सरकारकडे मागणी करत आहे. मात्र मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यात सरकार कमी पडत आहे. ग्रामीण भागात मराठा समाजाची कित्येक मुले आज नोकऱ्यांविना बेरोजगार आहेत. आज गरीब घरातील गुणवंत मुलांना पैशांअभावी चांगले शिक्षण घेता येत नाही. गुणवंत मुलांना आपले भविष्य घडवता येत नाही. त्यामुळे शासनाने मराठा आरक्षणाचा लवकर निर्णय घ्यावा. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कविता जाधव, हेमलता वाघ, ग्रामसेवक ए. बी. राऊत, तानाजी जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख