shrimant kokant demmands vip security | Sarkarnama

मला मेघा पानसरे, हमीद दाभोलकरांसारखे संरक्षण द्या : श्रीमंत कोकाटे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

माझे नावं संशयितांच्या टार्गेट लिस्टमध्ये असल्याच्या बातम्या मला प्रसार माध्यमातून समजल्या आहेत. मला याबाबत पोलीस प्रशासनाने संपर्क केलेला नाही. मीच पोलिसांकडे जाऊन विशेष संरक्षणाची मागणी करणार आहे.

- श्रीमंत कोकाटे 

पुणे : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येसंदर्भात सुरु असलेल्या चौकशीत मी टार्गेटवर असल्याची बाब समोर आली आहे. सध्या एक पोलीस संरक्षणासाठी आहे, मात्र धोका लक्षात घेता हे संरक्षण पुरेसे नाही. त्यामुळे मेघा पानसरे, हमीद दाभोलकर यांच्याप्रमाणे मलाही विशेष संरक्षण मिळावे', अशी मागणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. 

कोकाटे म्हणाले,"तालिबानी, इसिस जितके भयानक आहेत तितकेच सनातनवाले भंयकर आहेत. विचारांवर बंदी आणणे, विचारवंतांना धमक्‍या देणे, त्यांचा आवाज बंद करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. मी गेल्या वीस वर्षांपासून प्रबोधनाचे काम करतोय. लोकशाहीला पूरक काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संपवण्याचा कट केला आहे. पण मी असल्या धमक्‍यांना घाबरत नाही.' 

"सनातनसारख्या संघटनांवर आता बंदी घालण्याची गरज आहे. या संघटनांवर जर बंदी घातली नाही तर देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचू शकतो.आपल्या देशाची अवस्था सिरिया, अफगाणिस्थान सारखी होऊ शकते."असे कोकाटे म्हणाले. 

संबंधित लेख