shrigonda rada | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

श्रीगोंद्यातील पाचपुते-जगताप गटांत पुन्हा राडा! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 जून 2017

श्रीगोंदा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप यांचे कार्यकर्ते व माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांत शनिवारी पुन्हा राडा झाला. दोन्ही गटांत हाणामारी झाल्याने एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. 

नगर : श्रीगोंदा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप यांचे कार्यकर्ते व माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांत शनिवारी पुन्हा राडा झाला. दोन्ही गटांत हाणामारी झाल्याने एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. 

या मारामारीची फिर्याद भाजपचे गणेश चांदगुडे यांनी दिली. रस्त्याने जात असताना युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. ऋषिकेश गायकवाड, मंगेश सूर्यवंशी, अक्षय काळे, मंगेश मोटे आदींनी चांदगुडे यांना अडवून मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. दुसरी फिर्याद ऍड. ऋषिकेश गायकवाड यांनी दिली. या फिर्यादीनुसार नगरसेवक सुनील वाळके याने गायकवाड यांना अडवून मारहाण केली. तसेच "बबनराव पाचपुते यांना विरोध करतो. तुझा 30 जूनला वाढदिवस कसा साजरा होतो तेच बघतो,' असे म्हणत तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल करून घेत ऍड. ऋषिकेश गायकवाड व गणेश चांदगुडे यांना अटक केली. 

श्रीगोंद्यात पाचपुते विरुद्ध जगताप या दोन्ही गटांमध्ये विस्तव जात नाही, अशी स्थिती आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपची मोठी कुमक, राष्ट्रीय पातळीचे नेते आणूनही माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना विजय खेचून आणता आली नाही. या उलट कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या एकमेव सत्तेच्या जोरावर व जनसंपर्कावर ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप यांचे चिरंजीव राहुल जगताप यांनी विधानसभेची निवडणूक जिंकून पाचपुते यांना मोठा हादरा दिला. अनेक वर्षे सत्ता उपभोगलेल्या पाचपुते यांना हा पराभव पचणारा नव्हता. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वारंवार वाद होत आहेत. 

संबंधित लेख