shreepad chindam nashik | Sarkarnama

धक्काबुक्कीच्या भीतीने श्रीपाद छिंदम कारागृहात एकाकी ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणारा भाजपचा पदच्च्युत उपमहापौर श्रीपाद छिंदम सध्या नाशिक रोड कारागृहात आहे. त्याला येथेही काही कैद्यानी धक्काबुक्की केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याच्यावर सध्या बारीक लक्ष ठेवले जात असुन त्याला कोणाच्याही संपर्कात येऊ दिले जात नाही. त्यामुळे छिंदमला कारागृहात स्वतःशीच संवाद करत असतो असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

छिंदम याला नाशिक रोडच्या कारागृहात प्रारंभी नियमित कैद्यांसमवेत ठेवले होते. यावेळी दुसऱ्या दिवशी त्याला दोघांनी चापटी मारल्या होत्या असे वृत्त आहे. त्यानंतर त्याला अन्य कैद्यांशी संपर्क येणार नाही अशा पद्धतीने स्वतंत्र भागात हलविले. शिवाय संवेदनशील विषय असल्याने त्याच्यावर कारागृह पोलिसांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे सध्या छिंदमचा कोणाशीही संपर्क होत नसल्याने तो अनेकदा स्वतःशीच बोलत असतो. अन्य कैदी मारहाण करतील अशी भीती त्याला सतावत असावी असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सध्या छिंदमबाबत वरिष्ठांना रोजच माहिती कळविली जाते. सुरवातीला त्याला स्वतंत्र कक्षात हलवावे असा विचार होता. मात्र जागेची उपलब्धता नसल्याने ते शक्‍य झाले नाही. सुरक्षेसाठी अंडा सेल मध्ये हलविण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्‍यक असते. तशी परवानगी नसल्याने अंडा सेल मध्ये त्याला हलविता आलेले नाही. 

छिंदमविषयी परिसरातही नाराजी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला अन्यत्र हलवावे असे आंदोलन करुन कारागृह अधीक्षकांना निवेदन दिले होते. रविवारी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आंदोलन झाले. त्यात छिंदमसारख्या प्रवृत्ती अंदमानला हलवाव्यात. त्याला नाशिक रोड कारागृहात ठेऊ नये अशी मागणी केली. त्यामुळे कोठडी संपेपर्यंत येत्या 2 मार्चपर्यंत कारागृह प्रशासनाला छिंदमच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. 

यासंदर्भात कारागृह अधिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी अन्य कैद्याप्रमाणेच त्याला वागणुक दिली जाते. वेगळी काहीही व्यवस्था नाही असे सांगितले. 

संबंधित लेख