shreehari ane and cm | Sarkarnama

गडकरी आणि फडणवीस यांना श्रीहरी अणे यांचा कडक इशारा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन देऊन आम्ही मते मागितली नाहीत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबद्दल आश्‍चर्य व्यक्त करत वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी फडणवीस, गडकरी यांच्यावर निशाणा साधला. नितीन गडकरी यांच्या म्हणण्या प्रमाणे "आम्ही सत्तेवर येऊ असे वाटलेच नाही म्हणून वाटेल ती आश्‍वासने आम्ही देत गेलो' या सदराखाली जर त्यांना वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा आणायचा असेल तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा देखील श्रीहरी अणे यांनी औरंगाबादेत दिला. 

वेगळा विदर्भ हा मुद्दा घेऊन आम्ही मते मागितली नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. यावर औरंगाबादेत आलेल्या श्रीहरी अणे यांनी आश्‍चर्य व्यक्त करत "वेगळे विदर्भ राज्य व्हावे यासाठी फडणवीस यांच्यासह सध्या राज्य व केंद्राच्या मंत्रीमंडळात असलेल्या विदर्भातील मंत्र्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते आणि वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरच मते मागितली होती असा दावा केला. 

श्रीहरी अणे म्हणाले, छोटी राज्ये हा भाजपचा अजेंडाच होता आणि ते अजूनही ते नाकारत नाहीत. पण सध्या सरकारमधील भाजप छोट्या राज्याच्या विषयापेक्षा विकासचा मुद्दा रेटत आहे. विकास झालेला नाही असे माझे मत आहे. पण स्वतंत्र राज्य हा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे विदर्भ राज्याच्या नावावर आम्ही मत मागितली नव्हती हे म्हणणे चुकीचे ठरेल. मुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि केंद्रातील विदर्भातील मंत्र्यांनी देखील विदर्भ राज्य देऊ असे सांगतच ते निवडणुकीला सामोरे गेले होते. 

एवढेच काय विदर्भातील केंद्रात असलेले आमचे नागपूरचे मंत्री नितिन गडकरी यांनी "आम्ही निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्‍वासन पूर्ण करावी लागतील असे वाटलेच नव्हते' असे विधान केले आहे. आता त्यांना विदर्भ राज्याचा मुद्दा देखील वाटेल त्या आश्‍वासन सदरात घ्यायचे असेल तर मग याची किंमत त्यांना मोजावी लागेल. 

संबंधित लेख