"चांदणी' चमकतच राहणार....

 "चांदणी' चमकतच राहणार....

मुंबई : जगासाठी श्रीदेवी "चांदणी' होती. पण, माझ्यासाठी प्रेयसी, मैत्रीण आणि माझ्या मुलांची आई होती. माझे आणि दोन मुलींचे संपूर्ण आयुष्य तिच्या अवतीभवती फिरत होते. दु:ख शब्दांत व्यक्त करता येत नाही. आता आयुष्य पूर्वीसारखे नसेल, असे भावनिक पत्र चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी ट्‌विटरवर शेअर केले आहे. ती एक सर्वोश्रेष्ठ अभिनेत्री होती. कलाकार कधीच काळाच्या पडद्याआड जात नाही. कारण, तो नेहमी चंदेरी पडद्यावर चमकत राहतो, अशा शब्दांत त्यांनी पत्नी व अभिनेत्री श्रीदेवी यांना आदरांजली वाहिली आहे.

25 फेब्रुवारीला दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह मुंबईत आणताना काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. बुधवारी (ता. 28) श्रीदेवी यांच्यावर मुंबईत अत्यंसंस्कार झाले. त्यानंतर बोनी कपूर यांनी ट्विटरवर भावनिक पत्र शेअर केले. या पत्रात त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचे हळवे नाते अधोरेखित केले आहे.

पत्रात बोनी कपूर यांनी लिहिले आहे, की एक मित्र, पत्नी आणि दोन मुलींची आई गमावल्याचे दु:ख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आम्हाला आधार देणारे माझे कुटुंब, मित्र परिवार, सहकारी, हितचिंतक आणि श्रीदेवीच्या असंख्य चाहत्यांचा मी आभारी आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो की अर्जुन आणि अंशुला यांनी आम्हाला आधार दिला. आम्ही एकत्रितपणे या दु:खाला सामोरे गेलो. श्रीदेवीशिवाय पुढे जगण्याचा मार्ग आम्हाला शोधायचा आहे. ती आमचे आयुष्य होती. आमच्या जगण्याचे, हसण्याचे कारण होती. जगासाठी श्रीदेवी चांदणी होती. पण, आमचे आयुष्य तिच्या अवतीभवती फिरायचे. जान्हवी आणि खुशीसाठी ती सर्व काही होती. त्यांचे आयुष्य होती. 

तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतो की, आमचे दु:ख आम्हाला वैयक्तीकरित्या व्यक्त करू द्या. तिच्या सारखी दुसरी अभिनेत्री होणे नाही. "रेस्ट इन पीस माय लव्ह' अशा शब्दांत बोनी कपूर यांनी पत्राचा शेवट केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com