चक्रधरस्वामींच्या पुजनाने आमदार सानपांचा दिनारंभ

राजकारणात वावरत असल्याने अनेक कामे लोकांच्या भावनांचा आदर म्हणून करावी लागतात. मी मात्र सामाजिक परंपरा म्हणून नव्हे तर कौटुंबिक संस्कार म्हणून श्रावण पाळतो. शनिवार, सोमवारी आवर्जुन उपवास करतो. शाकाहारी आहे. श्रावणाच्या मनोहारी वातावरणात अधुन मधुन गरमा गरम कांदा भजी खायला आवडतात - बाळासाहेब सानप
चक्रधरस्वामींच्या पुजनाने आमदार सानपांचा दिनारंभ

नाशिक : ''राजकारणात वावरत असल्याने अनेक कामे लोकांच्या भावनांचा आदर म्हणून करावी लागतात. मी मात्र सामाजिक परंपरा म्हणून नव्हे तर कौटुंबिक संस्कार म्हणून श्रावण पाळतो. शनिवार, सोमवारी आवर्जुन उपवास करतो. शाकाहारी आहे. श्रावणाच्या मनोहारी वातावरणात अधुन मधुन गरमा गरम कांदा भजी खायला आवडतात,'' असे आमदार व भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप हे आपल्या श्रावणमासाबाबत बोलताना सांगतात.

'शीव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या माथी', असे संत सांगतात. त्यामुळे बालपणापासून महानुभाव पंथाचे दैवत असलेल्या चक्रधर स्वामींचे देवस्थान असलेल्या जाळीच्या देवाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मी दर्शनासाठी जातो. श्रावणात माझी रोजची दिनचर्या पूजेने सुरु होते. पूर्वी मी दाढीही वाढवत असे. सध्या मात्र दाढी ठेवत नाही. मात्र श्रावणातील उर्वरीत सर्व धार्मिक उपक्रम, सामाजिक प्रथांचे पालन जाणीवपूर्वक करतो. बालपणापासून मांसाहार वर्ज्य आहेच, असेही आमदार सानप यांनी सांगितले आहे.

राजकीय क्षेत्राविषयी अनेक प्रवाद पसरवले जातात. पसरतात. त्यामुळे नेते व त्यांच्या सवयी याबाबत कार्यकर्ते परस्पर समज गैरसमज करवुन घेतात. आमदार सानप यांचे कार्यकर्ते मात्र श्रावणातील त्यांच्या पथ्यांविषयी तेवढेच ठाम आहेत. त्यामुळे 'श्रावण' पाळणारा आमदार म्हणून  त्यांचा उल्लेख होतो. त्यांचे कुटुंबीय महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत. शेतकरी आणि सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. बालपणापासून त्यांच्यावर शाकाहार, आध्यात्म्य, साधेपणाचे संस्कार आहेत. त्यांनी ते सतत जपले. त्यामुळे रोजचा दिनक्रम तसाच आहे. सकाळी श्रीकृष्ण मंदिरात पूजेनंतरच त्यांची दिनक्रीया सुरु होते. नाशिकमध्ये असल्यावर ते कितीही व्यग्र असले, कामकाज कुठेही असले तरी दिवसातून एकदा ते गोदावरी काठी असेलल्या चक्रधर स्वामींच्या मंदिरात दर्शनाचा नेम चुकवत नाहीत. अपेयपान वर्ज्य आहे. त्यामुळे राजकारणात वावरतांना, कार्यकर्ते सांभाळतांना अनेकदा ही पथ्ये पाळतांना धर्मसंकटही येते. मात्र आजवर आपली पथ्ये कधीही मोडली नाहीत असे आमदार सानप यांनी निर्धारपूर्वक सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com