is shivtare making difficulties for Bapat? | Sarkarnama

बापटांना अडचणीत आणण्यासाठी शिवतारेंकडून पुणेकर वेठीस? 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पुणे : कालवा समितीच्या निर्णयानंतरही पुण्याचे पाणी कमी करण्यात येणार नाही, असे पालमंत्री बापट यांनी ठामपणे सांगिल्यानंतर आठच दिवसांतच बापट यांना कल्पना न देताच पुण्याचे पाणी थेट कमी करण्यात आले. जलसंपदा खात्याचे अधिकारी थेट पालिकेवर फौजदारी करण्याची भूमिका घेतात. पंपिंग स्टेशन पोलिस बंदोबस्तात बंद करण्यासाठी पावले टाकतात, ही सारी लक्षणे वरवरची नसून यात राजकीय युद्ध असल्याचे आता बोलले जात आहे.

शिवसेनेकडून राज्यमंत्री असलेल्या विजय शिवतरे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर कुरघोडी केली आहे. वरवर वाटणारा हा केवळ पाणी कपातीचा विषय नाही तर बापट व शिवतरे यांच्यातील राजकारणाचा हा परिपाक असून राजकारणासाठी शिवतरे यांनी पुणेकरांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

गेल्या काही वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये होणारा वाद आणि त्या माध्यमातून दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांचा संदर्भ याला आहे. पुण्याच्या मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणी पुण्याला दिले जात असल्याचे नेहमी सांगण्यात येते. वाढीव पाणी गेल्या अनेक वर्षांपासून घेण्यात येते. गेल्या 15 वर्षात पुण्याची वाढलेली लोकसंख्या पाहता पाणी वापर वाढणे साहजिक आहे.
 
मात्र कालवा समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची इतकी घाई जलसंपदा राज्यमंत्री शिवतरे यांना झाली की त्यांनी पोलीस बंदोबस्तात पर्वती जलकेंद्राला पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या साऱ्या घडामोडींची कोणतीच कल्पना पालकमंत्री असलेल्या बापट यांना नसावी हे विशेष. पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळित करून पालकमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा डाव यामागे शिवतरे यांचा असावा, अशी शंका घेण्यास वाव आहे.

नवरात्रानंतर पाणी पुरवठा कपातीचे वेळापत्रक तयारू करून पाणी पुरवठ्यात कपात करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र अत्यंत कार्यक्षम असलेल्या शिवतरे यांना तेवढा वेळ नव्हता. त्यांनी तातडीने निर्णयाची अमंलबजावणी केली. त्यासाठी पालकंमंत्री असलेल्या बापट यांना विश्‍वासात घेणे शिवतरे यांना संयुक्तिक वाटले नाही. 

संबंधित लेख