shivtare challenges supriya sule | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मी विरोधात उमेदवार नव्हतो म्हणून सुळे खासदार झाल्या : शिवतारे

दत्ता जाधव
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

माळशिरस : आदरणीय उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपण कोण आहोत, हे आधी पाहावे. उद्वव ठाकरेंवर पुन्हा बोलताल तर दिल्लीऐवजी बारामतीत घरी बसवू, असे आव्हान जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

माळशिरस : आदरणीय उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपण कोण आहोत, हे आधी पाहावे. उद्वव ठाकरेंवर पुन्हा बोलताल तर दिल्लीऐवजी बारामतीत घरी बसवू, असे आव्हान जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

उद्वव ठाकरे यांनी आधी स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधावे आणि नंतर राममंदिराकडे बघावे, अशी टीका अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचे फाटलेले राजीनामे द्या, अशी उपरोधिक टीका सेनेवर केली होती. या टिकेला शिवतारे यांनी उत्तर दिले. पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील शिंदवणे घाटावरील पुरंदर उपसाच्या पंपगृहावरील पुरंदर उपसाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना तालुक्यातील राष्टवादीच्या नेत्यांची खिल्ली उडविली.
 
शिवतारे यांनी सांगितले की गेल्या लोकसभा निवडणुकीत मी भाजप-सेना युतीचा उमेदवार असतो तर काय झाले असते, ते वेगळे सांगायला नको. त्यामुळे केवळ माझ्यामुळे सुप्रिया सुळे या लोकसभेत गेल्या आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

``उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या करिश्म्यावर ६३ आमदार निवडून आणले. त्यांच्यावर तुम्ही टीका करता. आदरणीय पवार साहेबांची कन्या या व्यतिरिक्त आपले काम काय हे पाहावे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी पवारसाहेबांशी असणारे संबंध यामुळे भाजपचा विरोध डावलून राज्यसभेत सुळे यांना प्रथम बिनविरोध पाठवले. हे त्यांनी विसरू नये,`` याचेही स्मरण त्यांनी करून दिले.

 

संबंधित लेख