Shivsena's Sanjay Raut Criticism on BJP in Pandharpur | Sarkarnama

भाजपमध्ये वाचाळांची संख्या अधिक - संजय राऊत

भारत नागणे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

सोमवारी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची पंढरपुरात जाहीर सभा होणार असून.सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीची पहाणी करण्यासाठी खासदार राऊत आज पंढरपुरात आले होते. पहाणी नंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर राम मंदिर प्रश्नावरून पुन्हा टीका केली.

पंढरपूर : भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या अधिक आहे. अनेक दिवसांपासून काही नेते पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी जाणिवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असे सांगत या पुढे भाजपाने राम मंदिराचा मुद्दा घेऊ नये, राम मंदिर बांधण्यासाठी शिवसेना समर्थ आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज येथे सांगितले.

सोमवारी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची पंढरपुरात जाहीर सभा होणार असून.सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीची पहाणी करण्यासाठी खासदार राऊत आज पंढरपुरात आले होते. पहाणी नंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर राम मंदिर प्रश्नावरून पुन्हा टीका केली.

खासदार राऊत म्हणाले, " शिवसेना कधी भूतकाळाचा विचार करत नाही. भविष्यकाळ आणि वर्तमान काळाचा विचार करून वाटचाल सुरू आहे. अयोध्येनंतर प्रथमच उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी पंढरपुरात सभा घेतली आहे. राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने घेतल्यानंतर भाजप नेते हनुमानाची जात काढून सामाजिक विषमता निर्माण करू लागले आहेत. अलीकडेच भाजप नेते नितीन गडकरी यांनीच पक्षातील वाचाळ वीरांच्या तोंडात बांबू घालण्याची वेळ आल्याची आहे सांगितले आहे. त्यामुळे भाजपला बांबूचा कारखाना काढावा लागेल," असेही राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेने राष्ट्रीय स्तरावर आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उत्तर प्रदेशात नंतर शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथमच मेळावा घेतला आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष राहिला नसून तो आंतरराष्ट्रीय पक्ष झाला आहे, अशी खिल्ली ही खासदार राऊत यांनी उडवली. पंढरपुरातील सभेनंतर उध्दव ठाकरे यांना अनेक राजकीय नेते भेटणार आहेत. यावेळी काही नेत्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होईल असेही राऊत यांनी सांगितले.
 

संबंधित लेख