Shivsena`s offer to MP Nana Patole | Sarkarnama

भाजप खासदार नाना पटोलेंना शिवसेनेची ऑफर

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

भंडारा : भाजपचे खासदार नाना पटोले यांना शिवसेनेची ऑफर असल्याचे समजते. पटोले भाजप सोडणार हे स्पष्ट असून ते कोणत्या पक्षात जाणार अद्यापही स्पष्ट नसल्याने सेनेच्या ऑफरने पुन्हा पटोले यांचा भाव मात्र आणखी वाढला आहे. 

खासदार पटोले यांनी भाजपच्या नेतृत्वावर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला हजेरी लावली नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी ते भाजप सोडणार हे स्पष्ट झाले आहे. ते कोणत्या पक्षात जाईल, हे स्पष्ट नाही. 

नागपुरातील एका कार्यक्रमात मोदींवर टीका केली. त्या कार्यक्रमानंतर त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची स्तुती केली होती. त्यामुळे ते कॉंग्रेसमध्ये परत जातील, असे म्हटले जात होते. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्यास प्रफुल्ल पटेल यांनाच भंडारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये जाण्यासाठी ते सावध पावले उचलत आहे. 

शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी नाना पटोले यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप नाना पटोले यांना दिल्याचे समजते. या संदर्भात भंडारा जिल्ह्यातील शिवसेना नेता व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नाना पटोले सारखा नेता सेनेत यावा, यासाठी उद्धव ठाकरे इच्छुक असून त्यांनीही नाना पटोले यांच्याशी बोलण्यास मला सांगितले होते. नाना पटोले हे जिल्ह्यातील महत्त्त्वपूर्ण नेते असून त्यांचे सेनेते स्वागत असल्याचे भोंडेकर यांनी सांगितले. 

संबंधित लेख