बरोरांच्या उमेदवारीला डोळखांबच्या शिवसैनिकांचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे तिकीट दिलेच तर त्यांना कडवा विरोध करायचा असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. या बाबत आज डोळखांब येथे बैठक झाली.
बरोरांच्या उमेदवारीला डोळखांबच्या शिवसैनिकांचा विरोध

किन्हवली :राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे तिकीट दिलेच तर त्यांना कडवा विरोध करायचा असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. या बाबत आज डोळखांब येथे बैठक झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत.येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे तिकीट दिले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर डोळखांब, साकडबाव, सोगाव, विभागातील शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवासेना व महिला आघाडीच्या सुमारे तीनशे  शिवसैनिकांनी आज (दि.9)कुणबी समाज हॉल डोळखांब येथे दुपारी बैठक घेतली. स्वपक्षातील कोणताही उमेदवार डावलून आयात उमेदवाराला उमेदवारी दिली अथवा कुठल्याही पदाधिकाऱ्यावर कारवाई केली तर सामुदायिक राजीनामे देण्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. 

या वेळी बैठकीस उपतालुका प्रमुख बाळा धानके, नामदेव हरणे, हरिभाऊ शिंदे, विभाग प्रमुख भास्कर भोईर, अशोक कुडव, देविदास सांबरे, मालू खोडका, रानविहिरचे उपसरपंच उत्तम डोहळे,महिला आघाडी  उपतालुका प्रमुख कुंदा हरणे व सोगाव,डोळखांब, साकडबाव या  तिन्ही भागातील शाखा प्रमुख ,उप शाखा प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.आज बरोरा यांनी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत येण्याचे संकेत दिले आहेत. तर इकडे डोळखांबच्या शिवसैनिकांनी त्यांच्या उमेदवारीला  विरोध दर्शवित नेतृत्वापुढे आव्हान उभे केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com