आमदार हेमंत पाटील व मुंदडा समर्थकांत हिंगोलीसाठी थेट `मातोश्री`वर शाब्दिक वाद

आमदार हेमंत पाटील व मुंदडा समर्थकांत हिंगोलीसाठी थेट `मातोश्री`वर शाब्दिक वाद

मुंबई : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेतून कोणाला उमेदवारी द्यायची यावरचा वाद थेट `मातोश्री`वर आज उफाळला. हिंगोला लोकसभा मतदारसंघासाठी जयप्रकाश मुंदडा यांच्या नावाला काही पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. 

माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा हे वसमत विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते आणि नांदेड जिल्ह्यातील आमदार हेमंत पाटील या दोघांमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी चुरस आहे. एकमेकांच्या विरोधातील मुद्दे या वेळी मांडण्यात आले. हिंगोलीचा उमेदवार आपण लवकरच ठरवू, असे सांगत ठाकरे यांनी दोन्ही बाजूंना शांत केले. 

आमदार हेमंत पाटील यांनी मात्र असा काहीच प्रकार घडला नसल्याचा दावा केला. मी आणि मुंदडा हे सकाळपासून एकत्र होतो. आम्हा दोघांच्या समर्थकांत वाद झाल्याच्या अफवा हिंगोलीतील काॅंग्रेसच्या काही नेत्यांनी पसरविल्याचा आरोप त्यांनी केला.

हिंगोली मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार सुभाष वानखेडे यांचा केवळ 800 मतांनी काॅंग्रेसच्या राजीव सातव यांनी पराभव केला होता. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुरक्षित मानला जातो. वानखेडे हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठी चुरस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com