Shivsena workers clash with separate Vidarbha supporters | Sarkarnama

विदर्भवाद्यांच्या अांदाेलनात शिवसैनिकांचा राडा

सरकारनामा ब्युराे
सोमवार, 1 मे 2017

काही शिवसैनिकांनी तर विदर्भवादी कार्यकर्त्यांच्या हातातील विदर्भ राज्यांचे बॅनर फाडून टाकत त्यांच्या अंगावर माती फेकण्याचाही प्रकार घडला. तर काही शिवसैनिकांनी अखंड महाराष्ट्राच्या घाेषणा देत रस्त्यावर फटाक्यांची अातषबाजी केली.

अकाेला: विदर्भ राज्याच्या मागणी समर्थनार्थ विदर्भवादी नेत्यांनी साेमवार (ता.एक) महाराष्ट्र दिनाचे अाैचित्य साधून काळा दिवस पाळण्यासाठी अायाेजित कार्यक्रमात घुसून शिवसैनिकांनी जाेरदार राडा केला.

यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये अर्धा तास तुफान घाेषणा युद्ध, धक्काबुकीचा प्रकार घडला. पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शिवसैनिक व विदर्भवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. 

महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून विदर्भवाद्यांकडून करण्यात येत अाहे. विदर्भ राज्याच्या मागणीच्या समर्थनार्थ विदर्भवादी नेत्यांनी साेमवार (ता.एक) महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून काळा दिवस पाळण्याचे ठरविले हाेते.

त्यानुसार बसस्थानक चाैकात विदर्भ केसरी ब्रिजलालजी बियाणी यांच्या पुतळ्यासमाेर विदर्भवादी कार्यकर्ते धनंजय मिश्रा, ललित बहाळे, डॉ. निलेश पाटील, मनाेज पाटील, श्री. गावंडे अादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत वेगळ्या विदर्भ करण्यासाठी घाेषणा देत वेगळ्या विदर्भाचा ध्वज फडकविला.

विदर्भवाद्यांचे अांदाेलन सुरू हाेताच शिवसेनेचे  उपजिल्हा प्रमुख गाेपाल दातकर, महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, महानगराध्यक्ष अतुल पवनीकर, तरूण बगेरे, अश्वीन नवले अादी पदाधिकारी व शिवसैनिकांनी तेथे घुसून विदर्भवादी कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर फाडून टाकले. तसेच त्यांना धक्काबुक्की करत अखंड महाराष्ट्राच्या घाेषणा दिल्या.

काही शिवसैनिकांनी तर विदर्भवादी कार्यकर्त्यांच्या हातातील विदर्भ राज्यांचे बॅनर फाडून टाकत त्यांच्या अंगावर माती फेकण्याचाही प्रकार घडला. तर काही शिवसैनिकांनी अखंड महाराष्ट्राच्या घाेषणा देत रस्त्यावर फटाक्यांची अातषबाजी केली. पाेलिसांनी काही शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक अाणि विदर्भवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले अाहे. 

संबंधित लेख