shivsena worker attacked and stabbed | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

शिवसेना कार्यकर्त्यावर नगरमध्ये कोयत्याने वार 

सरकारनामा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

.

नगर: महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आज माळीवाडा परिसरातील शिवसेनेचा कार्यकर्ता सागर थोरात याच्यावर जुना बाजार रोडवर कोयत्याने वार करण्यात आला.

हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. आज रात्री साडेआठच्या सुमारास थोरातकडे घोळक्‍याने काही कार्यकर्ते आले. त्यांनी थोरातला मारहाण करीत कोयत्याने वार केला.

याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांनी गस्त वाढविली आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, की भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी थोरातवर हल्ला केला. भाजप दबाव व पैशांचे राजकारण करत आहे. 

संबंधित लेख