Shivsena Women Wing opposes Wine Shop in Trimbakeshwar | Sarkarnama

त्र्यंबकेश्‍वरला दारु दुकानाचा प्रस्ताव शिवसेनेच्या आक्रमक महिलांनी रोखला 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना केरुरे यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीस निघुन गेल्याने महिलांना अडीच तास ताटकळत बसावे लागले. कंटाळलेल्या महिला त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवुन निघुन आल्या. दोन दिवसांपूर्वीच नगरपालिकेत दारु दुकानाला ना हरकत दाखला देण्याचा विषय चर्चेला आला होता. मात्र वाढत्या विरोधामुळे आता हा प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही असे सूत्रांनी सांगितले.

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर ज्योर्तीलींग नगरी आणि सिंहस्थासाठी जागतिक वारसा स्थळांत नोंद झालेल्या धार्मिक शहरात शहरात दारु दुकानाला परवानगी देण्याचे घाटत होते. दारु दुकानाची कुणकण लागताच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक होत नगरपालिकेत धडकल्याने नगरपालिकेला हा प्रस्ताव रद्द करावा लागला. 

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना केरुरे यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीस निघुन गेल्याने महिलांना अडीच तास ताटकळत बसावे लागले. कंटाळलेल्या महिला त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवुन निघुन आल्या. दोन दिवसांपूर्वीच नगरपालिकेत दारु दुकानाला ना हरकत दाखला देण्याचा विषय चर्चेला आला होता. मात्र वाढत्या विरोधामुळे आता हा प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही असे सूत्रांनी सांगितले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा कल्पना लहांगे यांसह मंदाताई दातीर, माधुरीताई जोशी, मंगलाताई आराधी, शहर प्रमुख कल्पेश कदम, तालुका संघटक संपत चव्हाण यांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. 

विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या या नगरपालिकेत 1997 मध्ये याच पक्षाच्या विधान परिषद सदस्या डॉ. निशीगंधा मोगल यांनी त्र्यंबकेश्‍वरला दारु दुकानांना परवानगी देऊ नये यासाठी विधीमंडळात प्रस्ताव सादर केला होता. नगरपालिकेतही यापूर्वी तसा ठराव झालेला होता. तरीही अचानक दारु दुकानाचा प्रस्ताव आला कसा, हा प्रश्न विचारला जातो आहे. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख