महाराष्ट्रावर भगवा फडकवणारच; विरोधकांच्या छाताडावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणारच : उद्धव ठाकरे

महाराष्ट्रावर भगवा फडकवणारच; विरोधकांच्या छाताडावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणारच : उद्धव ठाकरे

पुणे : महाराष्ट्रावर भगवा फडकणार नाही तर  फडकवणारच, असे आव्हान देत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रेरीत केली. कितीही आव्हाने आली तरी विरोधकांच्या छाताडावर शिवेसनेचा मुख्यमंत्री बसविणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त गोरेगाव येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्रावर सत्ता आणायची, हा निर्धार करून शिवसैनिकांनी येथून जावे, असे आवाहन त्यांनी केली.

माझे सैन्य आता इरेला पेटले आहे. त्यामुळे सेनापतींचे काम निम्म कमी होणार आहे. नियमाप्रमाणे सदस्य म्हणून मी माझी नोंदणी केली आहे. तुम्हीही आता त्याकडे लक्ष द्या. माझा पक्ष शिवसेना हा महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष झाला पाहिजे. त्यासाठी तयारी करा. फोनच्या मिस काॅलवर मला सदस्य नको. मला हवं ते रोखठोक. समोरासमोर हवे. केवळ फोनवर होणारे सदस्य मला नकोत, असे त्यांनी सांगितले.

``शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करणार म्हणजे करणारच. जे आव्हान देत आहेत. त्यांच्या छाताडावर मी मुख्यमंत्री करून दाखवेन. शिवसेना काय भूमिका घेते, याकडे आज संपूर्ण देशाचे लक्ष आहे. ही सारी ताकद शिवसैनिकांनी उभी केली आहे. मोदींच्या घरावर म्हणे उडती तबकडी फिरल्याचे बातमी मी वाचली. पृथ्वीवर फिरण्यासारखे मोदींचे राहिलेले नाही. त्यामुळे मोदी मंगळावर रवाना, अशी बातमी वाचावी लागेल,`` अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

जम्मू-काश्मिरमधील पीडीपी सरकाराचा पाठिंबा भाजपने काढला. तीन वर्षानंतर तेथील सरकार नालायक असल्याचे यांना कळाले. त्यासाठी अनेक सैनिकांना हौतात्म्य पत्करावा लागलं. सत्तेसाठी यांनी तडजोड केली. त्यांनी ही युती केली कशासाठी? भाजपने हा निर्णय उशिरा घेतला तरी मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र पाकिस्तानला पूर्ण ठेचल्यावर मी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेन, असे आव्हान त्यांनी दिले.    

राजकारणात, निवडणुकीत जयपराजय होत असतात. जिंकणं हे खूप सुखावह असतं. विशेष म्हणजे हरल्यानंतरही जी माणसं भिऊ नको मी तुझ्या पाठीशी, असं सांगतात. ती माणसं जपा, असाही सल्ला त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com