shivsena will alliance with BJP : patil | Sarkarnama

शिवसेना ही भाजपसोबत युती करणारच : चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

संजय मिस्किन
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

मुंबई : आगामी निवडणुकांत शिवसेना ही भाजपसोबत युती करणारच आहे. त्यामुळे आधी युतीचं सरकार येवू द्या. मग कोणाचा मुख्यमंत्री करायचा ते ठरेल, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढील दिशा स्पष्ट केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

शिवसेना नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा सूर लावला आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की शिवसेनेसोबत अगोदर युती होणार आहे. त्यानंतर निवडणूका युती करूनच लढल्या जातील. निकालानंतर ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल. 

दरम्यान, शिवसेनेने स्वबळावरच लढण्याचा निर्धार केल्याचे विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेने भाजप सोबत युती करायला हवी. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी स्वबळावरच सर्व निवडणूका लढवल्या. मात्र प्रत्येक निवडणूकीत दोघांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने भाजपशी युती करावी म्हणून आम्ही खासगीत बोलतच असतो. मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही त्यांना युतीचा प्रस्ताव देत असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजप व सेनेने एकत्र लढविल्या तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पालापाचोळ्यासारखी उडून जाईल. तसेच भाजप-शिवसेनेचे सरकार पुन्हा आल्यास ते जनतेसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी फायद्याचे ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित लेख