पारखे खंडणी प्रकरणामुळे शिवसेनेची बदनामी : पक्षाची पारख चुकली

पारखे खंडणी प्रकरणामुळे शिवसेनेची बदनामी : पक्षाची पारख चुकली

खंडणी प्रकरणामुळे शिवसेना पक्षाची मोठी बदनामी झाली असल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. याचे पडसाद आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीवर उमटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने पारखे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.

पुणे : मुंबईतील बिल्डर हिरानंदानीकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून धालेवाडी तर्फे हवेली (ता. जुन्नर) गटातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब विठ्ठल पारखे यांना अटक झाल्याच्या घटनेमुळे जुन्नर तालुक्यतील (जि. पुणे) राजकारण ढवळून निघाले आहे.

या प्रकरणामुळे शिवसेनेचे बदनामी झाल्याची भावना शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. पारखे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. याबाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निर्णय घेतील, अशी भूमिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे व जिल्हा उपप्रमुख संभाजी तांबे यांनी जाहीर केली आहे.

पारखे यांची जन्मभूमी जुन्नर असून, कर्मभूमी मुंबई आहे. मुंबईत स्थायिक असलेल्या पारखे यांना फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत धालेवाडी तर्फे हवेली या गटातून शिवसेनेची उमेदवारी दिली होती. तालुक्यात उद्योजक म्हणून ख्याती असलेले पारखे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या गटनेत्या अशा बुचके यांनी प्रयत्न केले होते. बुचके यांच्यामुळेच पारखे 8 हजार 684 मताधिक्‍याने विजयी झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीत पारखे यांनी मुक्त हस्ते केलेल्या खर्चाची तालुक्‍यात रंगतदार चर्चा झाली होती.

 
राजकीय पार्श्वभूमी नसलेले पारखे यांना शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत समाजसेवा करण्याची संधी मिळाली होती. तालुक्यात शिवसेनेच्या ताब्यात पंचायत समिती, जुन्नर नगरपालिकेसह काही मोठ्या ग्रामपंचायतीची सत्ता आहे. तालुक्यातील राजकीय सत्तेत शिवसेना पक्ष आघाडीवर असताना खंडणी प्रकरणामुळे शिवसेना पक्षाची मोठी बदनामी झाली असल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. याचे पडसाद आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीवर उमटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने पारखे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे. 

"आढळराव घेणार अंतिम निर्णय' 
याबाबत तालुका प्रमुख खंडागळे व तांबे म्हणाले, ""या घटनेमुळे पक्षाची बदनामी झाली आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र, या प्रकरणातील सत्यता पडताळणे आवश्‍यक आहे. शिवसेना कार्यकर्त्यांशी आम्ही संपर्कात आहोत. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. पारखे यांच्या बाबतचा अंतिम निर्णय खासदार आढळराव पाटील हेच घेतील.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com