shivsena targets bjp government | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

निवडणुकांत भाजपचा पैसा लाटांसारखा बाहेर पडतो : शिवसेनेचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पुणे :सगळेच विरोधात असताना भाजपचे लोक जिंकतात कसे, ही शंका आता शिवसेनेलाही येऊ लागली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामना`मध्ये भाजपच्या कारभारावर पुन्हा सडकून टीका करण्यात आली आहे.

पुणे :सगळेच विरोधात असताना भाजपचे लोक जिंकतात कसे, ही शंका आता शिवसेनेलाही येऊ लागली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामना`मध्ये भाजपच्या कारभारावर पुन्हा सडकून टीका करण्यात आली आहे.

निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा. हे शेतकऱ्यांच्या बाबतीत झाले, तसे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतदेखील झाले. या जुमलेबाजीविरुद्ध आधी शेतकऱ्यांनी बंड केले व आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बंड केले. तुम्हाला सत्तेवर आणणारे हेच लोक आहेत. त्यांनीच आता उद्रेक केला आहे. हेच लोकप्रियतेचे लक्षण आहे काय? प्रजा पोटापाण्यासाठी संपावर आहे. राजा म्हणतो, मी लोकप्रिय आहे, असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

भाजपने नुकतीच जळगाव आणि सांगली महापालिकेची निवडणूक जिंकली. त्याची कारणमीमांसा या अग्रलेखात करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की सरकारच्या तिजोरीत पैसा नसला तरी  तो सरकार चालवणाऱ्यांच्या खिशात पैसा आहे. हा पैसा प्रत्येक निवडणुकीत लाटा उसळाव्या तसा बाहेर पडत असतो. जळगाव, सांगली महानगरपालिका निवडणुकीत ते पुन्हा दिसले. सरकारी कामे बंद पडली आहेत, कारण सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकार चालवणाऱ्यांकडे जाहिरातबाजी करण्यासाठी हजारो कोटी रुपये आहेत. निवडणुका लढविण्यासाठी व सत्ता टिकविण्यासाठी बेहिशेबी, बेकायदेशीर ‘व्हाईट मनी’ बाहेर पडतो, असा गंभीर आरोप यात करण्यात आला आहे.  

मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत म्हणूनच ते एकापाठोपाठ एक अशा निवडणुका जिंकत आहेत. राज्यात इतका असंतोष असतानाही भाजपच जिंकते, असे या मंडळींचे म्हणणे आहे, पण राज्यात शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सारेच नाखूष आहेत, तरीही भाजपवाले जिंकतात कसे, याचे उत्तर अग्रलेखातून अशा प्रकारे द्यायचा प्रयत्न केला आहे.

संबंधित लेख