shivsena to start to include muslim | Sarkarnama

शिवसेनेची आता "मी मराठी मुसलमान' मोहीम 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

मुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही. मराठवाडातील बीडमधील कट्टर शिवसैनिक नसिब शेख यांनी "मी मराठी मुसलमान' ही अनोखी मोहीम सुरू केली असून मराठी मुस्लिमांनी शिवसेनेच्या पाठिशी उभे राहणे आवश्‍यक असल्याची मोहिम त्यांनी उघडल असून त्याबाबतचा व्हिडिओ त्यांनी समाजमाध्यमांवर टाकला आहे. 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील मुस्लिमबहुल भागांमध्ये नसिब शेख फिरणार असून शिवसेनेसाठी मुस्लिमांनी मतदान करावा यासाठी ते प्रचार करणार आहे. दलित नेते प्रकाश आंबेडकर यांनी एआएमआयएम या पक्षाशी आघाडी केल्याने त्याचा फटका थेट फायदा भाजपला होणार आहे. शिवसेनेला मुस्लिम मते फारशी पडत नसल्याची तक्रार शिवसेनेचे खासदार देखील अनेक वेळा करत असतात. पण यापुढच्या काळात मुस्लिम मतांना दूर न ढकलता त्यांना जवळ करण्यासाठी "मी मराठी मुस्लमान' या छोट्या शिवसैनिकाने सुरू केलेली मोहिम शिवसेना पक्षाची मोहिम म्हणून सुरू करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न

परळी तालुक्‍यातील शिरसाळा येथील रहिवासी असलेले शेख यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून मुस्लिमांनीं यावे यासाठी असे आवाहन केले आहे. याविषयी "सकाळ'शी बोलताना शेख यांनी स्पष्टीकरण दिले, शिवसेना कधीच देशभक्‍त मुस्लिमांच्या विरोधात नव्हती. मात्र शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आणि जातीयवादी असल्याचा चुकीचा प्रचार विरोधक करत राहिले त्याचा फटका शिवसेनेला कायम बसला आहे. शिवसेनेची ही प्रतिमा बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.  
 
संबंधित लेख