Shivsena spokesperson Kayande criticises Sachin Pilot | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

आधी राहुल गांधींना राजकारण शिकवा, मगच शिवसेनेवर बोला : मनीषा कायंदे

सुचिता रहाटे
शनिवार, 10 जून 2017

आधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीना राजकारण शिकवा आणि मगच शिवसेनेवर बोलण्याचे धाडस करा, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे युवानेते सचिन पायलट यांनी मुंबईत बोलताना शिवसेनेच्या राजकारण करण्याच्या पद्धतीवर टीका केली  होती. त्यावर 'सरकारनामा'ला मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

मुंबई : आधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीना राजकारण शिकवा आणि मगच शिवसेनेवर बोलण्याचे धाडस करा, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे युवानेते सचिन पायलट यांनी मुंबईत बोलताना शिवसेनेच्या राजकारण करण्याच्या पद्धतीवर टीका केली  होती. त्यावर 'सरकारनामा'ला मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना पक्षाने कसे काम करावे हे सांगण्यात पायलट यांनी आपली बुद्धी खर्च करू नये. त्यापेक्षा डगमळलेल्या काँग्रेसची धुरा पायलट यांनी सांभाळावी. तसेही काँग्रेस पक्षाला केंद्रात विरोधी पक्ष म्हणूनही कोणी विचारत नाही. राजस्थानच्या नेत्याला महाराष्ट्रातल्या राजकारणातले काय कळते? पायलट यांना सांगा भरकटलेल्या राहुल गांधींना ताळ्यावर आणा आणि काँग्रेस पक्ष चालवून दाखवा. स्वतःच्या पक्षाची अशी वाईट दैना झालेली असताना दुसऱ्या पक्षाबद्दल कसे काय बोलू शकतात, अशी तिखट प्रतिक्रिया कायंदे यांनी दिली.

शिवसेनेला सरकारमध्ये धड रहायचे ही नाही आणि सत्तेचा मोह सुटतही नाही. सत्तेत राहून विरोधकासारखे वागणे हा शिवसेनेचा विचित्रपणा आहे. त्यामुळे राजकारणातील शिवसेनेची दुटप्पी भुमिका बरोबर नाही. केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी पायलट मुंबईत आले होते. त्यावेळी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पायलट यांनी शिवसेनेवर टीका केली.

संबंधित लेख