युती झाल्यास शिवसेनेने आढळरावांऐवजी नवीन उमेदवार द्यावा

युती झाल्यास शिवसेनेने आढळरावांऐवजी नवीन उमेदवार द्यावा

मंचर : "शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांत विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे यांसह अनेक प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर जनतेत मोठी नाराजी आहे. मतदारसंघात भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा मोठी आहे. येथून भाजपचा उमेदवार सहज निवडून येईल, असा दावा राज्य भाजपचे ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष विकास रासकर यांनी केला.

येथील जागेसाठी भाजप प्रबळ दावेदार आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यास निष्क्रिय आढळराव पाटील यांच्याऐवजी नवीन उमेदवार द्यावा,'' अशी मागणी त्यांनी केली.

 मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. 20) झालेल्या पत्रकार परिषदेत रासकर बोलत होते. या वेळी संजय थोरात, भानुदास काळे, प्रमोद परदेशी, सुधाकर राजे, रवींद्र त्रिवेदी उपस्थित होते.

रासकर म्हणाले, ""आढळराव पाटील यांना रोजगार निर्मितीसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीपूरक उद्योग उभारता आला नाही. पण, स्वतःच्या फायद्याचे उद्योग-व्यवसाय त्यांनी उभे केले आहे. पुणे-नाशिक रेल्वेबाबतही त्यांच्याकडून दिली जाणारी माहिती संशयास्पद आहे. जर ही माहिती खरी असती, तर 15 दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेची घोषणा केली असती. या रेल्वेच्या मार्गाबाबतही आढळराव यांच्या वक्तव्यात भिन्नता आढळून येते. लक्षद्वीप, डेहराडून, जम्मू-काश्‍मीर आदी विमानतळ डोंगरी भागात आहेत. मात्र, आढळराव पाटील यांनी सतत नकारात्मक भूमिका घेऊन रक्त सांडण्याची भाषा केल्याने खेडचे विमानतळ पुरंदरला गेले आहे. विमानतळ झाले असते, तर या परिसरातील शेतमाल परदेशात गेला असता. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असते.''

 
""खेड ते सिन्नर महामार्गाचे खेड व आंबेगाव तालुक्‍यात काम पूर्ण झाले नाही. शिक्रापूर, वाघोली, हडपसर भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. भाजपच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. नियोजनबद्ध सर्वांगीण व दीर्घकाळ परिणाम करणारे "अच्छे दिन' आणणारा विकास लवकरच जनतेला भाजपच्या माध्यमातून पाहायला मिळेल,'' असा विश्वास रासकर यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com