होय, शिवसेनेचे भाजपशी  मतभेद आहेत : संजय राऊत 

होय, शिवसेनेचे भाजपशी  मतभेद आहेत : संजय राऊत 

मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील. शिवसेनेची भूमिका इतकीच अडचणीची वाटत असेल तर भाजपने सत्ता सोडावी असा सल्ला देतानाच होय ! शेतकऱ्याच्या मुद्यावर शिवसेनेचे भाजप सरकारशी मतभेद आहेत अशी कबुली शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी आज येथे दिली. 

जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहिल्या, शेतकऱ्यांचे शाप मिळत राहिले, तर कोणतेही सरकार अस्थिर होते, शिवसेनेला सत्तेची पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपला आमचा त्रास होत असेल, अडचण होत असेल, तर मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी तसं स्पष्ट सांगावे असे राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

"" कुणी म्हणत असेल की उद्धव ठाकरे परदेशात आहेत तर आमचे त्यांना सांगणे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीही सध्या परदेशात आहेत मग त्यांना काय म्हणणार,'' असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 

राष्ट्रपती निवडणूकीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, "देशाचे राष्ट्रपती निवडायचे आहेत, त्यामुळे शिवसेनेची स्वतंत्र भूमिका असू शकते. हिंदू राष्ट्र संकल्पना राबवण्यासाठी सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्याशिवाय दुसरी कुणी आदरणीय व्यक्ती असूच शकत नाही. आम्ही शेवटपर्यंत भागवत यांच्याच नावाचा पुरस्कार करित राहू असा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com