भाजपने सांगूनही शिवसेनेने ते तीन उमेदवार बदलले नाहीत आणि ..... 

तेच ते आणि मतदारांना नकोशे झालेले चेहरे दिल्याने शिवसेनेचे नुकसान झाले असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे
adsul-adhalrao-geete
adsul-adhalrao-geete

मुंबई :  लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना जुने चेहरे देवू नका असा निरोप दिल्यानंतरही शिवसेनेने तीच च ती नावे पुढे केल्याने तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत.
भाजपने सात उमेदवार बदलावेत अशी सूचना शिवसेनेला केली  होती असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले . 

 त्यात अनंतराव  गीते (रायगड ), आनंदराव अडसूळ (अमरावती )आणि आढळराव पाटील (शिरूर )यांना बदलले तर ते योग्य ठरेल असा निरोप देण्यात आला होता.मात्र चेहरे बदलले न गेल्याने शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत. या मतदारसंघांमध्ये पत्करावी लागलेली हार भाजपच्या आधीच लक्षात आली होती,मात्र त्या दृष्टीने पावले उचलली गेली नाहीत. 

राष्ट्रावादीच्या सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये अनंतराव गीते यांचा पराभव केला आहे . तर आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीचे अभिनेते - नेते अमोल कोल्हे यांनी पराभूत केले आहे . तर आनंदराव आडसूळ यांना राष्ट्रावादीच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या  उमेदवार नवनीत राणा यांनी पराभवाच्या छायेत लोटले आहे . 

तेच ते  आणि मतदारांना नकोशे झालेले चेहरे दिल्याने शिवसेनेचे नुकसान  झाले असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com