Shivsena politcs Barne questions Neelam Gorhe's authority | Sarkarnama

उद्धव  ठाकरेंसमोर बारणे यांनी नीलम गोऱ्हे यांचा केला पाणउतारा ; कदम - गोगावलेंत खडाजंगी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई     : शिवसेनेतील निष्ठेचा वाद सोमवारी   मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच उफाळून आला.

वाढदिवसानिमित्त ठाकरे यांच्या व्यक्तिगत भेटीसाठी गेलेल्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या पक्षातील स्थानाबाबतच खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रश्‍न उपस्थित केल्यावर त्या भावूक झाल्या. त्यांना भावना अनावर झाल्या .

मुंबई     : शिवसेनेतील निष्ठेचा वाद सोमवारी   मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच उफाळून आला.

वाढदिवसानिमित्त ठाकरे यांच्या व्यक्तिगत भेटीसाठी गेलेल्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या पक्षातील स्थानाबाबतच खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रश्‍न उपस्थित केल्यावर त्या भावूक झाल्या. त्यांना भावना अनावर झाल्या .

 तर दुपारी झालेल्या बैठकीत महाडचे आमदार भरत गोगावले आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्यात गोगावले यांनी अप्रत्यक्षपणे कदम यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्‍नचिन्ह लावले. पक्षनिष्ठेबरोबरच निवडणुकीतील अर्थपुरवठ्याबाबतचे उल्लेखही या बाचाबाचीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मातोश्रीवर आज शिवसेनेचे मंत्री, आमदार-खासदारांची बैठक होती. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळून आल्याचे सांगण्यात येते. आमदार गोगावले यांनी आगामी निवडणुकीत मंत्र्यांची भूमिका काय असेल? आम्हाला मंत्री व्हायचे नाही, पण मंत्र्यांनी आमच्याशी व्यवस्थित बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत वादाला तोंड फोडले.

त्यावर सर्व मंत्र्यांना एकाच पिंजऱ्यात उभे करू नका. सरळ मंत्र्याचे नाव घ्या; मी आताच्या आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे प्रत्युत्तर रामदास कदम यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

" नारायण राणे पक्ष सोडून निघाले होते तेव्हा कोण कोण निष्ठावंत होते, हे आम्हाला माहीत आहे; तेव्हा आमच्यासारखे शिवसैनिक खंबीरपणे उभे राहिले. मंत्र्यांना आमच्याशी नीट बोलायला सांगा. ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत आहेत. त्यात आमचे मंत्री किती आर्थिक पाठबळ देणार हे त्यांनी सांगावे," असे गोगावले म्हणताच "आम्ही तुमच्यापेक्षा जास्त निवडणुका लढलो आहोत. त्या बिन पैशांच्या जिंकलोही आहोत हे लक्षात ठेवा' असे प्रत्युत्तर कदम यांनी दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.शाब्दिक चकमकीतून पक्षावरील निष्ठेचा प्रश्‍नही उपस्थित झाला.

कदम आणि गोगावले यांना ठाकरे यांनी शांत केल्यानंतरही पक्षनिष्ठेचा वाद संपेना. उद्धव यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या वाढदिवसानिमत्त नीलम गोऱ्हे आज ठाकरे यांची भेट घ्यायला गेल्या. त्या वेळी तेथे  श्रीरंग  बारणेही उपस्थित होते.

"गोऱ्हे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? गोऱ्हेंनी आम्हाला शिवसेना काय हे शिकवू नये, अशा शब्दांत ठाकरे यांच्यासमोरच  श्रीरंग बारणे यांनी गोऱ्हेंवर तोफ डागली, असे समजते .  त्यावर गोऱ्हे काहीशा भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण सावरत त्यांनी  श्रीरंग  बारणे यांना प्रत्युत्तर दिले. शिवसेनेवरची माझी निष्ठा काय आहे हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. मला निष्ठा कोणाला सांगायची नाही, असे त्यांनी बारणे यांना सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

संबंधित लेख