पिंपरी शिवसेनेने पुन्हा धनुष्य ताणले : आता बीआरटीत घोळ केल्याचा आरोप 

शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी पत्रकारपरिषद घेऊन रस्तेकामाच्या निविदेत गडबड झाल्याचा आरोप या अगोदर केला आहे. त्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. नंतर त्यात चौकशीही लागली. त्याचप्रकारे शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे, कलाटे आणि नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी पत्रकारपरिषदेत या दुसऱ्या घोटाळ्याचा आरोप केला.
पिंपरी शिवसेनेने पुन्हा धनुष्य ताणले : आता बीआरटीत घोळ केल्याचा आरोप 

पिंपरी : पिंपरी पालिकेच्या समाविष्ट गावातील साडेचारशे कोटी रुपयांच्या रस्तेकामांत नव्वद कोटींचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपानंतर पालिकेत यापेक्षाही मोठा घोटाळा बीआरटी प्रकल्पात झाल्याचा आरोप शिवसेनेने आज केला. त्याला त्यांनी आजी, माजी सत्ताधारी असलेल्या भाजप, राष्ट्रवादीला जबाबदार धरले आहे. बांधकाम परवाना बंदीवरून शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्यातील आरोप, प्रत्यारोपाच्या पार्श्‍वभूमीवर आज हा नवा आरोप करण्यात आला आहे. त्यातून शिवसेना आणखी आक्रमक झाली असून भाजपला यानिमित्त सेनेने पुन्हा टार्गेट केले आहे. 

शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी पत्रकारपरिषद घेऊन रस्तेकामाच्या निविदेत गडबड झाल्याचा आरोप या अगोदर केला आहे. त्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. नंतर त्यात चौकशीही लागली. त्याचप्रकारे शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे, कलाटे आणि नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी पत्रकारपरिषदेत या दुसऱ्या घोटाळ्याचा आरोप केला. याप्रकरणी मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान यांच्याकडे तक्रार करणार असून न्यायालयातही धाव घेणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. 

भोसले म्हणाले, "गेल्या दहा वर्षातील "बीआरटी'च्या कामात 114 कोटीची 39 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीतून त्याला दुजोरा मिळतो आहे.त्यामुळे जनतेच्या या कररूपी पैशाची वसुली या भ्रष्टाचारात सामील असलेले पदाधिकारी, अधिकारी,सल्लागार आणि ठेकेदार यांची व त्यांच्या संपत्तीची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडून (इडी) करण्याची मागणी आहे. या प्रकल्पावर देखभालीसाठी सुरक्षा यंत्रणा, उद्यान विभाग, विद्युत व स्थापत्य विभागाचा वेगळा खर्च अजूनही सुरूच आहे. अद्याप कार्यान्वित न झालेल्या प्रकल्पावर खर्च करणे म्हणजे ठेकेदार, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे खिसे भरण्याचा हा उद्योग आहे. अनेक बसस्टॉपची सामग्री, साहित्य चोरीला गेले. परंतु, याबाबत एकही पोलिस तक्रार करण्यात आलेली नाही." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com