Shivsena Neelam Gorhe Demands Task Force to avoid Sakri incidents | Sarkarnama

साक्रीसारख्या घटना टाळण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची निलम गोऱ्हे यांची मागणी

संजय शिंदे
बुधवार, 11 जुलै 2018

साक्री येथे किडनी चोरण्यासाठी व मुले पळविण्यासाठी आल्याच्या संशयावरुन नाथपंथी डवरी समाजातील ५ निष्पाप लोकांची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. यावरुन राज्यात गदारोळ उडाला होता. याच प्रकारच्या अफवा आणि घटना मालेगाव, परभणी, लातूर, संभाजीनगर या भागात पूर्वी झालेल्या आहेत.

नागपूर/मुंबई : धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मुले चोरण्याच्या अफवेवरुन घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स किंवा आयोग नेमावा, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार डाॅ. निलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली. 

साक्री येथे किडनी चोरण्यासाठी व मुले पळविण्यासाठी आल्याच्या संशयावरुन नाथपंथी डवरी समाजातील ५ निष्पाप लोकांची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. यावरुन राज्यात गदारोळ उडाला होता. याच प्रकारच्या अफवा आणि घटना मालेगाव, परभणी, लातूर, संभाजीनगर या भागात पूर्वी झालेल्या आहेत. तसेच देशातील झारखंड, बिहार, ईशान्य भारतातील भागात असे आता पर्यंत एकूण २२ लोकांचे बळी गेले आहेत.त्या पार्श्वभूमीवर डाॅ. गोऱ्हे यांनी या घटना टाळण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी नियम ९७ अन्वये झालेल्या चर्चेत केली. या संदर्भात डाॅ. गोऱ्हे यांनी काही सूचनाही केल्या. त्या पुढीलप्रमाणे - 

§संवेदनशील आणि समाजात तिढा निर्माण करणाऱ्या अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवाव्यात.

§बाळकृष्ण रेणके यांनी भटक्या जमाती बाबत अहवाल मांडला आहे त्याचा आधार घेऊन या समाजाला न्याय देण्यासाठी निधी उपलब्ध करुन टास्क फोर्स किंवा एखादा आयोग नेमावा.

§भटक्या समाजातील लोकांचे प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये पुनर्वसन करावे व त्यासाठी विशेष योजना,तसेच निधीची तरतूद करावी.

§व्हॉट्सअपवर येणाऱ्या अफवांवर पायबंद घालण्यासाठी, अशा समाजकंटकांना व ज्यांनी तो मेसेज ज्यांनी मूळ पाठवला असेल त्याला शिक्षा करावी, त्यासाठी कायदा करावा.

§मानवी तस्करी, किडन्या चोरणाऱ्या टोळ्या असा कुणा बाबत संशय आल्यास त्यांना मारून कायदा हातात न घेता त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तरच समाजातील भीती कमी होईल, तरच या परिघावरील समाजाला न्याय मिळेल.

सरकारनामा म्हणजे राजकीय बित्तंबातमी - आजच अॅप डाऊनलोड करा आणि अपडेट रहा

संबंधित लेख