शिवसेना नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबीर

 शिवसेना नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबीर

मुंबई : शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी आज वांद्रे येथील रंगशारदा मध्ये प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिवसभर चालणार असून दोन सत्रांत या शिबिराची विभागणी करण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या कार्यकारीणीतील बदल व कामकाजांच्या आढावाबाबत चर्चा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पहिल्या सत्रात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतील. तसेच या सत्राचे प्रस्तावना व सुत्रसंचालनाची भूमिका यशवंत जाधव पार पाडतील. या सत्रात काही प्रमुख नेत्यांना विविध विषयांवर वक्ते म्हणून बोलवण्यात आलेले आहे. मानद संचालक लक्ष्मणराव लटके नागरी समस्यांचे निवारण यावर मार्गदर्शन करतील. मनपा निवृत्त चिटणीस मृदुला जोशी सभागृहाचे कामकाज व आयुधे कसे असते यावर बोलणार आहेत. मनपा उपयुक्त चंद्रशेखर चौरे विकास आराखडयांचे नियोजन व अमंलबजावणी कशी करायची हे सांगतील. मनपा उपयुक्त रामभाऊ धस हे अर्थसंकल्पातील तरतुदी व पद्धती कशा असतात हे सांगतील. माजी महापौर सुनील प्रभू शिवसेनेचा वचननामा आणि का कसा पाळावा हे नगरसेवकांना पटवून देतील. गृनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर प्रकल्प कसा उभारावा यावर मार्गदर्शन करतील. 

प्रशिक्षण शिबिराचे दुसरे सत्र मुंबईच्या विद्याधर गोखले नाट्यगृहात पार पडेल. यासाठी मुंबईतील शिवसेनेचे आमदार, विभागप्रमुख व उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख व महिला संघटकांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. हे शिबिर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल. यासाठी ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य मुंबईचे नागरी जीवन व जनतेच्या शिवसेना नेत्यांकडून काय अपेक्षा व त्याची पूर्तता आपण कशी करू यावर मार्गदर्शन करणार आहेत. वास्तुरचनाकार चंद्रशेखर प्रभू मुंबईतील नवीन विकासाची नियमावली कशी असेल हे सांगतील. सभागृह नेता शैलेश फणसे मुंबईतील प्रभाग आणि त्याचा विकास कसा होईल यादृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com