Shivsena MP Shrirang Barne says I don't know who is Parth Pawar | Sarkarnama

शिवसेना खासदार  श्रीरंग बारणे म्हणतात , पार्थ पवार कोण मी ओळखत नाही  

उत्तम कुटे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पार्थ कोण मी ओळखत नाही,पार्थच काय कोणीही पवार मावळमध्ये उभे राहिले, तरी मला फरक पडत नाही.

-खासदार  श्रीरंग बारणे

 

पिंपरी: शिरूरनंतर मावळमधील शिवसेना खासदार  श्रीरंग बारणे  यांनी अजित पवारांना आज ललकारले. ' पार्थ कोण मी ओळखत नाही,पार्थच काय कोणीही पवार मावळमध्ये उभे राहिले, तरी मला फरक पडत नाही', या शब्दांत त्यांनी अजित पवारांना आव्हान दिले . 

खासदारकीची हँटट्रिक केलेले शिरूरमधील शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून कोणी लढण्यासच तयार नसल्याने अजितदादांनीच तेथून लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य नुकतेच केले होते. ते आव्हान आढळरावदादांनी स्वीकारलेच.एवढेच नाही, तर पवारांनी आपल्याविरुद्ध लढावेच,असे चँलेंजही त्यांनी दिले.

 दरम्यान,  शिवसेनेचचाच खासदार असलेल्या मावळमधून पार्थ पवार यांचे नाव अजित पवारांनी सुचवले होते . मतदारसंघात त्यांची पोस्टर लागली. कार्यक्रमालाही ते येऊ लागले. परिणामी ही चर्चा आणखी रंगली. त्यामुळे त्याबाबत बोलताना बारणे यांनी वरील आव्हान दिले. तसेच पार्थ हे पोस्टर बॉय असल्याची संभावनाही त्यांनी केली.

" मी २५ वर्षे राजकारणात असून काम करणार खासदार म्हणून माझी ओळख आहे. तर पार्थला त्यासाठी फ्लेक्सचा आधार घ्यावा लागतो आहे. काम आणि विकासावर निवडणूका लढल्या जात असून त्याची भीती पवारांना वाटत असावी. पार्थच नव्हे, तर कुठल्याही पवारांचे आपल्याला आव्हान नाही ,"असे श्रीरंग बारणे यांनी  सांगितले.

संबंधित लेख