Shivsena MP Sanjay Jadhav Says I Was in a mood to quit Shivsena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

होय, मी पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत होतो..; खासदार संजय जाधव यांनी उलगडला स्वतःचा संघर्ष

गणेश पांडे
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

परभणीचे खासदार संजय जाधव मोठ्या संघर्षातून राजकारणात यशस्वी झाले आहेत. दोनदा परभणी विधानसभेचे आमदार व 2014 पासून ते आजपर्यत परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार असा त्यांचा खरा राजकीय प्रवास आहे. त्या आधी खासदार संजय जाधवपरभणी नगर पालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते.

 

परभणी : 1996 साली आलेल्या युती शासनाच्या पाच वर्षाच्या काळात माझ्या सारख्या फाऊंडर मेंबरला सन्मानाने काही मिळण्याची आवश्यकता होती. परंतू, ते सोडून मला पदावरून काढले. त्यामुळे मी त्या काळात अस्वस्थ होतो. पक्ष सोडण्याचा विचारही मनात घोंगावत होता. परंतू, मी संयम बाळगला. पक्षातील आमचे गुरु रवींद्र वायकर यांच्या पाठींब्याने परत प्रवाहात आलो. नगरसेवक ते आज लोकसभेचा सदस्य हा माझा प्रवास माझ्या संघर्षाचे फलीत आहे. त्यामुळे 'वक्त से पहिले और भाग्य से जादा किसी को कुछ नही मिलता,' हे खर आहे असे सांगत खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या राजकीय जीवनातील संघर्ष सर्वासमोर उलगडला. 

परभणीचे खासदार संजय जाधव हे मोठ्या संघर्षातून राजकारणात यशस्वी झाले आहेत. दोनदा परभणी विधानसभेचे आमदार व 2014 पासून ते आजपर्यत परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार असा त्यांचा खरा राजकीय प्रवास आहे. त्या आधी खासदार संजय जाधव हे परभणी नगर पालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्याच काळात त्यांच्या संघर्षाचे खरे दिवस होते. शिवसेना प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठवाड्यातील विश्वसनिय शिवसैनिकापैकी संजय जाधव एक म्हणावे लागतील.
 
त्याकाळात शिवसेना संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या आक्रमकतेने समोर आलेला राजकीय पक्ष म्हणून चर्चेत होता. ज्वलंत हिंदूत्वाचा पुरस्कार करणारा म्हणून तमाम हिंदूच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेला पक्ष होता. त्याच शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यात सक्रिय राहणारे संजय जाधव हे एक आहेत. परंतू, शिवसेनेत सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षाचा होता, असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

बुधवारी (28) विभागीय सायकल स्पर्धेच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना खासदार संजय जाधव म्हणाले, "आपली भूमिका एका विषयावर केंद्रीत केली पाहीजे, यश मिळत नाही तो पर्यत बाजूला जायचे नसते. माझ्या बाबतीत ही असेच झाले होते. 1996 ते 2001 साला पर्यत शिवसेनेचे सरकार असतांनाही मी प्रचंड अस्वस्थ होतो. सत्ता आल्यानंतर फाऊंडर मेंबर म्हणून काही मिळण्याची आवश्यकता होती. परंतू तसे न होता. मला पदावरूनच काढण्यात आले. यामुळे मी त्या काळात अस्वस्थ झालो होते. नगरसेवक पदासाठी देखील माझ्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी स्पर्धा लावली. परंतू त्याकाळात आमचे गुरु रवींद्र वायकर यांनी मला प्राधान्य देऊन राजकारणात संधी दिली. त्यामुळे नगरसेवक ते खासदार पर्यतचा प्रवास मी केला."

संबंधित लेख