shivsena mla sawant | Sarkarnama

आजचा वाढदिवस : तृप्ती प्रकाश सावंत, वांद्रे पूर्व, आमदार, शिवसेना

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

तृप्ती प्रकाश सावंत या शिवसेनेच्या विद्यमान आमदार आहेत. मुंबई शहरातील वांद्रे पूर्व या विधानसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्या निवडून आल्या आहेत. दिवंगत आमदार बाळा उर्फ प्रकाश सावंत यांच्या त्या पत्नी असून 2015 मध्ये प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा 19 हजार मतांनी पराभव केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान या मतदारसंघात असल्याने या मतदार संघाच्या आमदारांना "मातोश्रीचा आमदार' म्हणून ओळखले जाते. 

संबंधित लेख