Shivsena MLA Gopikishan Bajoria | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळेल ?  अामदार गाेपीकिशन बाजाेरिया

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युराे
शुक्रवार, 9 मार्च 2018

 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून मित्रपक्ष भाजपविरुद्ध अांदाेलन पुकारणाऱ्या शिवसेनेकडून कर्जमाफीच्या मुद्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी भाजपची काेंडी करण्याचा जाेरदार प्रयत्न करण्यात येत अाहे. 

अकाेला  : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर अाक्रमक हाेत शिवसेना अामदार गाेपीकिशन बाजाेरिया यांनी जिल्ह्यातील 90 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अद्यापही लाभ मिळाला नसल्याचा मुद्दा रेटून धरत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या भाजपच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अाहेत.

केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडून भाजप सरकारच्या शेतकरी विराेधी धाेरणांवर सातत्याने टिकेची झाेड उठविल्या जात अाहे. त्यामुळे दाेन्ही पक्षात कुरघाेडीचे राजकारण वाढले असुन एकमेकांवर अाराेप-प्रत्याराेपांच्या फेरी झडत अाहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या मुद्यावर अाक्रमक झालेल्या शिवसेनेकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कर्जमाफीचा मुद्दा मांडत धरत भाजपची काेंडी करण्यात अाली अाहे.

शिवसेनेचे अामदार गाेपीकिशन बाजाेरिया यांनी अकाेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचा प्रश्न रेटून धरत सरकारची काेंडी केली अाहे. अकाेला जिल्ह्यातील कर्जमाफी याेजनेतील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत दाेन महिन्यापासून सुरू असुनही जिल्ह्यातील एक लाख 91 हजार 187 पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी 90 हजार 191 शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नसल्याचे जानेवारी 2018  दरम्यान निदर्शनास  अाले अाहे.

या प्रक्रियेला विलंब लागत असुन शेतकऱ्यांना कधीपर्यंत कर्जमाफी मिळणार अाहे? असा प्रश्न अामदार गाेपीकिशन बाजाेरिया यांनी उपस्थित केला. त्यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेतंर्गत 31 जानेवारी 2018 पर्यंत अकाेला जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या 97 हजार 318   खात्यावर 405.83 काेटी रुपये कर्जमाफीचे जमा करण्यात अाले असुन उर्वरीत लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले.

संबंधित लेख