Shivsena MLA Anil rathod Declares list of candidates for municipal corporation | Sarkarnama

आता भाजपशी युतीची शक्यता नाही म्हणून शिवसेनेचे उमेदवार जाहीर : अनिल राठोड 

सरकारनामा
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

नगर : " आता भाजपशी युतीची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेने महापालिकेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आता यापुढे राज्यपातळीवर युती झाल्यास आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांत विशेष बदल होणार नाहीत. मात्र श्रेष्ठींचे आदेश पाळू, "अशी भूमिका व्यक्त करून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले.

नगर : " आता भाजपशी युतीची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेने महापालिकेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आता यापुढे राज्यपातळीवर युती झाल्यास आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांत विशेष बदल होणार नाहीत. मात्र श्रेष्ठींचे आदेश पाळू, "अशी भूमिका व्यक्त करून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती होणार नसल्याचे गृहित धरून दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित केले आहे. आज शिवसेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे व राठोड यांनी प्रभागनिहाय उमेदवार जाहीर केले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.

राठोड म्हणाले, "शिवसेनेने प्रत्येक प्रभागांत चांगले उमेदवार दिलेले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. प्रत्येक उमेदवाराचे प्रभागातील वजन आणि त्याला सोबत पक्षाची ताकद आहे. त्यामुळे उमेदवार निवडून येण्यास अडचण येणार नाही."

" शिवसेनेने नगर शहराची सेवा केली. शहरात (कै.) बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार पेरले. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेनाच आघाडी घेईल, यात शंका नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर युती झाली असती, तर काहीतरी विचार केला. आता वेळ गेलेली आहे. आम्ही उमेदवार जाहीर केले. उमेदवारांनी जोरदार तयारीही केली आहे. त्यामुळे त्यात बदल होणार नाही. पण परिष्ठांचे आदेशाचेही पालन केले जाईल", असे राठोड यांनी सांगितले.

जाहीर झालेले उमेदवार असे ,

प्रभाग १ – दीपाली बारस्कर, डाॅ. चंद्रकांत बारस्कर. 
प्रभाग २ – प्रियांका तवले. 
प्रभाग ४ – योगिराज गाडे. 
प्रभाग ५ – कलावती शेळके. 
प्रभाग ६ – रवींद्र वाकळे. 
प्रभाग ७ – अशोक बडे, कमल सप्रे, रिता भाकरे, अक्षय कातोरे. 
प्रभाग ८ – सचिन शिंदे, शाम नळकांडे, रोहिणी शेडगे, पुष्पा बोरुडे.
 प्रभाग ९ – सुरेश तिवारी.
 प्रभाग १२ – मंगल लोखंडे, चंद्रशेखर बोराडे, सुरेखा कदम, दत्तात्रेय कावरे. 
प्रभाग १३ – संगीता बिज्जा, सुवर्णा गेन्नापा, उमेश कवडे, सुभाष लोंढे. 
प्रभाग १४ – भगवान फुलसाैंदर, सुरेखा भोसले, रेखा भंडारी.
 प्रभाग १५ – परसराम गायकवाड, विद्या खैरे, अिल शिंदे. 
प्रभाग १६ – दिलीप सातपुते. 
प्रभाग १७ – मोहीनी लोंढे. 
काही प्रभागांत मात्र अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही.

संबंधित लेख