shivsena mla | Sarkarnama

स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षावर कारवाईची शिवसेनेकडून मागणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

उस्मानाबाद : आमदार तानाजी सावंत यांची बनावट ऑडिओ क्‍लीप तयार करून ती व्हायरल करत बदनामी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. गेल्या काही दिवसापासुन आमदार तानाजी सावंत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये संघर्ष सुरू आहे. आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भैरवनाथ कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर स्वतः राजू शेट्टी यानी साखर आयुक्तांची भेट घेऊन कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

उस्मानाबाद : आमदार तानाजी सावंत यांची बनावट ऑडिओ क्‍लीप तयार करून ती व्हायरल करत बदनामी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. गेल्या काही दिवसापासुन आमदार तानाजी सावंत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये संघर्ष सुरू आहे. आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भैरवनाथ कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर स्वतः राजू शेट्टी यानी साखर आयुक्तांची भेट घेऊन कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यात कारखान्याचा तात्पुरता परवाना निलंबित केला गेला. 

या प्रकारानंतर जिल्ह्यात एक ऑडीओ क्‍लिप सगळीकडे वायरल झाली होती. तानाजी सावंत यांच्या नावाने फिरत असलेल्या ऑडीओ क्‍लीपमध्ये सावंत यानी स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांना पैशाची ऑफर दिल्याचे संभाषण आहे. ही ऑडिओ क्‍लीप बनावट असून त्यातील आवाज तानाजी सांवत यांचा नसल्याचा दावा शिवेसनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या क्‍लिपमुळे तानाजी सावंत यांची बदनामी झाली असून काही प्रवृत्तीनी ही गोष्ट जाणीवपुर्वक केल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना नेते व पक्षाची बदनामी करण्याचे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांना कोणत्या नंबरवरुन फोन आला होता? तो कोणाच्या नावावर आहे? याची चौकशी करुन खोटी क्‍लिप तयार करत ती व्हायरल करणाऱ्यावर योग्य ती फौजदारी कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. 
 

संबंधित लेख