shivsena meeting | Sarkarnama

शिवसेनेत बैठकांचा "सिलसिला' ! 

सुचिता रहाटे 
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई : शिवसेनेत बैठकांचा "सिलसिला' सध्या सुरूच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सध्या चर्चेत असणारा सेना-भाजप वाद व पक्षात संघटनात्मक फेरबदलाबाबत चर्चा होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मांडणाऱ्या काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. विशेषतः महामंडळांमध्ये नियुक्ती होणाऱ्या महत्वाच्या पदांबाबतही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राज्यात भाजपचे सरकार येऊन 3 वर्षे पूर्ण होतील. परंतु कार्यकर्त्यांना महामंडळ व विविध समित्यांची अध्यक्षपदे मिळतील अशी आशा होती मात्र अजूनही नियुक्ती न झाल्यामुळे भाजपच्या कार्यकत्यांमध्ये तीव्र नाराजीआहे. सध्या याच पदांच्या नियुक्तींबाबत सेना-भाजप बैठकांवर बैठका घेत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत महामंडळांच्या विविध पदांवर नियुक्ती व नव्याने काही समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे सेना-भाजपमध्ये या पदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. 

टॅग्स

संबंधित लेख