shivsena meeting | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

भाजपचे नगरसेवक वेळेवर येतात, शिवसेनेचे का नाही ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

मुंबई : सभागृहात वाट्टेल तेव्हा येऊन चालणार नाही. वेळेत या; पण आल्यानंतर सभागृहात बसून व्हॉट्‌सऍपवर लक्ष ठेवू नका. कामकाजाकडे लक्ष द्या. भाजपचे नगरसेवक वेळेवर उपस्थित असताता, मग शिवसेनेचे का नाही असा सवाल करीत मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी मंगळवारी (ता. 2) स्वपक्षाच्याच नगरसेवकांचे कान पिळले. 

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. त्यात सर्वच वक्‍त्यांबरोबर महापौरांनी लेटलतीफ नगरसेवकांना सुनावले. भाजपचे नगरसेवक सभागृहात तसेच इतर बैठकांना वेळेवर पोहचात; पण शिवसेनेचे नगरसेवक वेळ पाळत नाहीत. त्यामुळे महापौर म्हणून मलाही सभागृहात उशिराने यावे लागते. विरोधकांच्या टीकेचा धनी व्हावे लागते. यापुढे असे चालणार नाही. सभागृह वेळेत सुरू करायचे असेल तर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी वेळेत यायला हवे. सभागृहात फक्त हजेरी लावण्यासाठी येऊ नका. सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत प्रत्येक नगरसेवकाने हजर राहिले पाहिजे, असा दमही महापौरांनी भरला. 
 
संबंधित लेख